Disha salian death : नारायण राणे-नितेश राणेंना दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या रिपोर्टमुळे झटका

मुंबई तक

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन प्रकरणात मोठी घडामोड घडलीये. दिशा सालियनचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात राणे पिता-पुत्राकडून आदित्य ठाकरे यांचंही नाव घेतलेलं होतं. पण, सीबीआयच्या अहवालानं या प्रकरणाला पूर्ण कलाटणी मिळाली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन प्रकरणात मोठी घडामोड घडलीये. दिशा सालियनचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात राणे पिता-पुत्राकडून आदित्य ठाकरे यांचंही नाव घेतलेलं होतं. पण, सीबीआयच्या अहवालानं या प्रकरणाला पूर्ण कलाटणी मिळाली आहे.

‘द इकोनॉमिक टाइम्स’ने दिशा सालियन प्रकरणासंदर्भात सीबीआयच्या अहवालाबद्दल वृत्त दिलं आहे. दिशा सालियनचा अपघाती मृत्यू झाल्याचं सीबीआयनं तपासाअंती म्हटलेलं आहे.

‘दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आणि दिशा सालियन प्रकरणाचा संबंध सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी जोडला गेला. दिशा सालियन काही काळासाठी सुशांत सिंह राजपूतसाठी काम करत होती. तिच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यात आलीये,” असं वरिष्ठ अधिकाऱ्यानं ‘ईटी’ला सांगितलं.

दिशा सालियन प्रकरणातील आरोप भोवले?, नारायण राणेंसह नितेश राणेंवरही गुन्हा

हे वाचलं का?

    follow whatsapp