"सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषीसारखे" इमाम इलियासींचं वक्तव्य

चीफ इमाम इलियासी यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली
dr imam umer ahmed ilyasi says mohan bhagwat visited on my invitation he rashtra pita and rashtra rishi
dr imam umer ahmed ilyasi says mohan bhagwat visited on my invitation he rashtra pita and rashtra rishi

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरूवारी दिल्लीतल्या मशिदीला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी मुस्लिम नेत्यांशी चर्चाही केली. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे डॉक्टर उमर अहमद इलियासी यांच्यासोबत मोहन भागवत यांची चर्चा झाली. मोहन भागवत यांच्या भेटीनंतर उमर इलियासी यांनी त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला. त्यांनी दिलेली ही उपमा चांगलीच चर्चेत आहे. खास करून सोशल मीडियावर या उपमेची चांगलीच चर्चा होते आहे.

dr imam umer ahmed ilyasi says mohan bhagwat visited on my invitation he rashtra pita and rashtra rishi
"प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचं?" मोहन भागवत यांचं ज्ञानवापीबाबत मोठं वक्तव्य

काय म्हणाले उमर इलियासी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हे राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषींप्रमाणे आहेत. माझ्या निमंत्रणानंतर ते आज या ठिकाणी आले आहेत. देवाची पूजा करण्याच्या आमच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मात्र आज मोहन भागवत या ठिकाणी आल्यानंतर एक चांगला संदेश देशभरात गेला आहे. तसंच आमच्या पद्धती एक असल्या तरी आम्ही माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म मानतो.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली मशिदीला भेट

सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिल्लीतल्या मशिदीला भेट दिली. त्यानंतर मुस्लिम नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. त्याआधी मोहन भागवत यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी आणि दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग यांच्यासह मुस्लिम नेत्यांशीही चर्चा केली.

dr imam umer ahmed ilyasi says mohan bhagwat visited on my invitation he rashtra pita and rashtra rishi
पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

मोहन भागवत यांनी दिल्लीतल्या मदरश्यातही मुलांची भेट घेतली

सरसंघचालक मोहन भागवत यांनी कस्तुरबा गांधी मार्गावरच्या मशिदीत जाऊन मुस्लिम नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मरशात जाऊन तिथल्या मुलांची भेट घेतली आणि चर्चा केली. मदरशात काय शिकवलं जातं हे त्यांनी मुलांना विचारलं. मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच मदरशात जाऊन मुलांशी चर्चा केली.

दोन दिवसांपूर्वी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरु लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) जमीरुद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि परोपकारी सईद शेरवानी यांची आरएसएसच्या कार्यलायत झालेल्या बैठकीला हजेरी लावली होती. मोहन भागवत यांच्यासोबत त्यांची तब्बल दोन तास चर्चा झाली होती. सांप्रदायिक सलोखा मजबूत करणे आणि दोन्ही समाजाचे संबंध सुधारण्यावर व्यापक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी मुस्लीम संघटना जमीअत-उलेमा-ए-हिंद याचे नेता मौलाना अरशद मदनी यांनी दिल्लीतल्या आरएसएस कार्यालयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेतली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in