कुटुंबाच्या आणि मृत मुलांच्या आठवणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक
मुंबई: एकनाथ शिंदे आणि भाजपने आज सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यानंतर सर्व नेत्यांनी ठरावावर भाषण केले. शेवटी उभे राहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत असातान आपल्या कुटुंबाबत आणि मृत पावलेल्या दोन मुलांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावूक झालेले पाहायला मिळाले, त्यांना सभागृहात अश्रू अनावर झाले. भाषणात काय म्हणाले एकनाथ शिंदे? (Eknath Shinde) […]
ADVERTISEMENT

मुंबई: एकनाथ शिंदे आणि भाजपने आज सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यानंतर सर्व नेत्यांनी ठरावावर भाषण केले. शेवटी उभे राहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत असातान आपल्या कुटुंबाबत आणि मृत पावलेल्या दोन मुलांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावूक झालेले पाहायला मिळाले, त्यांना सभागृहात अश्रू अनावर झाले.
भाषणात काय म्हणाले एकनाथ शिंदे? (Eknath Shinde)
शिवसेना-भाजप सरकारच्या युतीमुळे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. गेल्या 20 दिवसांपासून सर्व 50 आमदारांनी माझ्यावर आणि माझ्या निर्णयावर विश्वास ठेवला आहे. मी त्या सर्वांचे आभार मानतो. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी भाषण करतोय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. ही घटना ऐतिहासिक आहे कारण आम्ही निघण्याचे धाडस केले आहे.
आम्ही आमच्या मिशनला निघायच्या एक दिवस आधी मी अस्वस्थ झालो होतो. विधान परिषदेच्या मतदानाच्या दिवशी माझ्याशी गैरवर्तन झाले. मुख्यमंत्र्यांनीही मला फोन करून विचारले कुठे चालला आहात? परत कधी येणार आहात? मी म्हणालो मला माहित नाही.