Ajit Pawar: 'आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत...', अजितदादांकडून 'त्या' कृतीचं समर्थन - Mumbai Tak - government power shiv sena ajit pawar bjp press conference ncp maharashtra political news in marathi - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Ajit Pawar: ‘आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत…’, अजितदादांकडून ‘त्या’ कृतीचं समर्थन

Breaking News Maharashtra Marathi: आम्ही याआधी शिवसेनेसोबत सत्तेत होतो. तर आता भाजपसोबत जाण्यामध्ये आम्हाला काहीही हरकत नाही असा दावा अजित पवार यांनी केला आहे. पाहा ते पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले.
Earlier we were in power with Shiv Sena. Now Ajit Pawar has claimed that we have no problem in going with BJP. See what he actually said in the press conference.

Breaking News Maharashtra Marathi: मुंबई: नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (2 जुलै) राज्याच्या राजकारणात जबरदस्त भूकंप घडवून आणला. यावेळी त्यांनी स्वत: उपमुख्यमंत्री पदाची शपथ तर घेतलीच पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) 9 दिग्गज नेत्यांना देखील मंत्री पदाची शपथ दिली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार आपल्यासोबत आहेत असा दावा अजित पवार यांनी केला. या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं की, ‘आम्ही जर शिवसेनेसोबत (Shiv Sena) जाऊ शकतो तर आम्ही भाजपसोबत (BJP) जाऊच शकतो..’ यामुळे या सरकारमध्ये जाण्यास आपल्याला काहीही अडचण नाही. असंच अजित पवार यावेळी म्हणाले.

पाहा पत्रकार परिषदेत अजित पवार नेमकं काय म्हणाले:

‘भाजपसोबत जाण्याबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती’

‘आज जो निर्णय घेतला आहे त्यासंदर्भात अनेक दिवस चर्चा सुरू होती. चर्चा चालू असताना वरिष्ठ पातळीवरचे सगळे जणं एकत्र बसायचो. देश पातळीवरची जी काही राजकीय परिस्थिती आहे. राज्याची जी काही परिस्थिती आहे या सगळ्याचा विचार करता आपण विकासाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं माझं आणि सर्व सहकाऱ्यांचं म्हणणं पडलं. त्यामधून देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही कारभार सुरू आहे. त्या कारभाराच्या निमित्ताने पाहिलं तर देशाला मजबुतीने पुढे नेण्याचा प्रयत्न हे मोदी साहेब करत आहेत. असा प्रयत्न करत असताना आपण त्या बाबीला पाठिंबा दिला पाहिजे.’

‘सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या बैठका होत आहेत. पण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. यामुळे विरोधी पक्षाच्या बैठका होतात त्यातून साध्य काहीच होत नाही.’

‘मी शुक्रवारीच विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला’

‘आज शिंदे-फडणवीस सरकार यांचं इथे होतं. इतके दिवस मी तिथे विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. पण शुक्रवारी मी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. मागे देखील वर्धापनदिनानिमित्त मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती.’

हे ही वाचा >> ”आम्ही तिघेही मिळून महाराष्ट्राला…”, अजित पवारांच्या शपथविधीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर आणि चिन्हावरच आम्ही निवडणूक लढवणार’

‘काही जणं आता वेगवेगळी टीका-टिप्पणी करणार आम्हाला टिका-टिप्पणीला फार उत्तर देण्याचं कारण नाही. आपण कामाशी मतलब ठेवत असतो. केंद्रीय निधी महाराष्ट्राला मिळेल हे पाहणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यासाठी हा निर्णय घेतला. हा निर्णय जवळपास बहुतेक आमदारांना मान्य आहे. लोकप्रतिनिधींना मान्य आहे. पक्ष सगळा आमच्यासोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. कुठल्याही निवडणुका असतील जे पक्षाचं चिन्ह आहे, नाव आहे.. त्याच नावाखाली.. चिन्हाखाली आम्ही निवडणूक लढवणार.’

‘आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत जाऊच शकतो…’

‘नागालँडला निवडणुका झाल्या होत्या.. तिथे जे राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले ते सगळे भाजपसोबत गेले. दुसरी गोष्ट काही जण त्या ठिकाणी वेगवेगळे आरोप त्या ठिकाणी करतील.. वास्तविक आम्ही साडेतीन वर्षांपूर्वी जो निर्णय घेतलेला होता त्याही वेळेस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार होतं. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..’

हे ही वाचा >> Ajit Pawar : “…म्हणून आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालो”

‘त्यामध्ये जातीयवादी म्हणण्याचा अधिकार.. जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षासोबत देखील जाऊ शकतो. त्यामुळे तिथे कुठलीही अडचण नाही.. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो. तर राज्याच्या विकासाकरिता आम्ही जाऊ शकतो.’ असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या आताच्या कृतीचं स्वत:च समर्थन केलं आहे.

Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ? भारतीय क्रिकेटरला ‘देवी’ म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर! शाहरुखच्या ‘जवान’ने 18 दिवसांत पार केला 1000 कोटींचा गल्ला पण… Mumbai : मुंबईतील ‘ही’ 6 भारी ठिकाणं, फॅमिलीसोबत करा एक्सप्लोर!