Mumbai Tak /बातम्या / सोमय्यांची बातमी खरी ठरली! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक
बातम्या राजकीय आखाडा

सोमय्यांची बातमी खरी ठरली! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अनिल परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केलं आहे. आज (शुक्रवारी) १० मार्चला सकाळी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दिवसभराच्या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कदम यांना ताब्यात घेतल्यानंतरच त्यांना अटक झाली आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. सदानंद कदम हे शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (10 मार्च) ईडीच्या पथकाने सदानंद कदम यांना दापोलीतून त्यांना ताब्यात घेतलं होतं. यावेळी तिथे त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. मात्र, त्यानंतर सदानंद कदम यांना ईडीचं पथक थेट मुंबईकडे रवाना झालं. त्यानंतर मुंबईत ईडी कार्यालयात सदानंद कदम यांची चौकशी झाली. किरीट सोमय्यांनी असाही दावा केला आहे की, सदानंद कदम हे अनिल परब यांचे बिझनेसमधील भागीदार आहेत. त्यामुळे आता पुढचा नंबर हा अनिल परब यांचा असणार आहे.

साई रिसॉर्टसह अनिल परबांच्या 10कोटींच्या संपत्तीवर ED ची टाच

दापोली साई रिसॉर्ट प्रकरण काय?

अनिल परब यांचं रिसॉर्ट मागच्या काही काळापासून ईडीच्या रडारवर होतं, त्याचा तपासही ईडीकडून करण्यात आला होता. याच रिसोर्टच्या आधारे ईडीने छापेमारी केली आहे, तसंच चौकशीही सुरू करण्यात आली होती.

‘असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला नाही’; सोमय्यांनी काढल्या अनिल परबांच्या पावत्या

या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना दापोली येथील जमीनाचा काही भाग 2017 मध्ये अनिल परब यांनी 1 कोटी रूपयांना खरेदी केल्याचं आढळून आलं होतं. या मालमत्तेची नोंदणी 2019 मध्ये झाली होती असंही समोर आलं होतं. सदर जमीन नंतर 2020 मध्ये शोध कारवाईमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एकाला 1.10 कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकली गेली.

सदरची जमीन तीच आहे ज्यावर 2017 ते 2020 या कालावधीत रिसॉर्ट बांधण्यात आलं. अनिल परब यांच्याववर जमिनीची नोंदणी होईपर्यंत रिसॉर्टच्या बांधकामाचा मोठा भाग बांधून पूर्ण झाला होता. नंतर २०२० मध्ये जेव्हा ही प्रॉपर्टी विकण्यात आली तेव्हा रिसॉर्टचं काम पूर्ण झालं होतं. त्यामुळे हे रिसॉर्टच अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईचं मूळ ठरलं.

दरम्यान, असाही आरोप करण्यात आला की, रिसॉर्टच्या बांधकामाची माहिती नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळेच या रिसॉर्टची चर्चा झाली आणि त्यावरून कारवाई सुरू झाली. आयकर विभाग शोध घेत असताना आढळलेल्या पुराव्यांवरून हे दिसून आलं की रिसॉर्टचं बांधकाम 2017 मध्ये सुरू झालं आणि या रिसॉर्टच्या बांधकामासाठी 6 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाला. त्या बांधकामाचा खर्च केबल ऑपरेटर आणि अनिल परब यांच्या हिशोबाच्या खात्यात नाही. आता याच प्रकरणामुळे सदानंद कदम हे अडचणीत आले असून अनिल परबांचा पायही खोलात गेला आहे.

ED: किरीट सोमय्या अगदी ठामपणे म्हणाले.., ‘अनिल परबला अटक होणारच!’

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?