शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीपूर्वी; किती जणांना दिली जाणार शपथ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पुढील इच्छुकांचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे-फडणवीस […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट सरकारचा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पुढील इच्छुकांचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी माहिती दिली. ‘सकाळ’ वृत्तपत्राशी बोलताना मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबद्दल भाष्य केलं.
शिंदे-फडणवीस सरकार : मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात मुनगंटीवार यांचाही समावेश आहे. शिंदे गट आणि भाजपमधील इच्छुकांना पुढील मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. याबद्दल बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “19 मंत्र्यांच्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी होईल. २८८ आमदारांच्या १५ टक्के मंत्री होऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळ ४३ जणांचं असेल”, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
Narayan Rane: “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही त्यांचाच होणार”