Aditya Thackeray : महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि एक डमी मुख्यमंत्री

आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघाती टीका
Maharashtra has one chief minister and one dummy chief minister Taunt Aditya Thackeray to Eknath Shinde
Maharashtra has one chief minister and one dummy chief minister Taunt Aditya Thackeray to Eknath Shinde

संपूर्ण देशात कुटुंबप्रमुख आणि प्रामाणिक माणूस म्हणून ओळखले जातात ते उद्धव ठाकरेच. सध्याचं सरकार हे धुळफेक करणारं सरकार आहेत. महाराष्ट्रात सध्या एक सीएम आणि एक डमी सीएम आहेत. हे सरकार आश्वासनं देतंय पूर्ण करत नाही. कोविड काळात आपण चांगलं काम केलं आहे. ते लोकांपर्यंत पोहचवायचं आहे असं आदित्य ठाकरेंनी सांताक्रुझमध्ये म्हटलं आहे.

गद्दारांचं सरकार तुम्हाला मान्य आहे का?

ज्या व्यक्तींनी, लोकांनी माझ्यावर आरोप केले तेच लोक आता इलेक्ट्रीक बस चालवून त्याचं कौतुक केलं आहे. गद्दारांच सरकार तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला देशात आणि राज्यात काय चाललं आहे ते मान्य आहे का? हे प्रश्नही आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. कोर्टात पाच न्यायाधीशांचं खंडपीठ फैसला करणार आहे. हे तात्पुरतं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असाही दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. एवढंच नाही तर राज्यात एक मुख्यमंत्री आणि एक डमी मुख्यमंत्री आहेत असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज्यातलं तात्पुरतं सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच

तात्पुरतं सरकार हे निवडणुका जेवढ्या लांबवायच्या तेवढ्या लांबवणार आहेत कारण यांना माहित आहे की विजय आपल्या शिवसेनेचा होणार आहे. मात्र आपण कामं केली आहेत. लोकांना सगळं माहित आहे. त्यामुळे लोकच या सरकारचा निवाडा करतील असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. हे सरकार मुंबईच्या मलईवर डोळा ठेवून आहे. ती त्यांना मिळू देणार नाही असाही दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.

२१ जूनला राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी उद्धव ठाकरेंनी तडजोड केली असं सांगत त्यांनी शिवसेना नेतृत्वालाच आव्हान दिलं. तसंच त्यांच्या या बंडात शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष ११ आमदार आले. या सगळ्यानंतर राज्यात राजकीय पेच निर्माण झाला. २९ जूनला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ३० जूनला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या सगळ्या घटनाक्रमापासूनच आदित्य ठाकरे हे राज्यभरात शिवसंवाद यात्रा करत आहेत. त्यांनी वारंवार गद्दारांना कधीही माफ करता येणार नाही असं म्हटलं आहे. आज उद्धव ठाकरे यांनीही माझ्याच लोकांनी मला दगा दिला या वक्तव्याचा पुनरूच्चार केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in