Mahesh Manjrekar: “महाविकास आघाडी सरकार पडण्याची कुणकुण सहा महिने आधीच लागली होती”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाविकास आघाडी सरकार पडण्याची कुणकुण सहा महिने आधीच लागली होती असं वक्तव्य अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं आहे. बिग बॉस मराठीचं चौथं पर्व लवकरच सुरू होतं आहे. सूत्रसंचालकाच्या भूमिकेत महेश मांजरेकर दिसणार आहेत. अशात एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे महाविकास आघाडी सरकारबाबत महेश मांजरेकर यांनी?

महाविकास आघाडी सरकार पडणार याची कुणकुण मला सहा महिने आधीच लागली होती. ही कुणकुण कुणाच्याही माध्यमातून नाही तर कळत होतं कारण विचारधारा वेगवेगळ्या असलेले पक्ष एकत्र आले होते. तो फुगा फुटणं अपरिहार्य होतं. एकाच फुग्यात हेलिअमही भरला होता आणि साधा गॅसही असंही महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे. मटा ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आणखी काय म्हणाले महेश मांजरेकर?

आयडियॉलॉजी वेगळ्या असलेले तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं. कितपत टिकेल हा प्रश्न पडला होताच. कुठला पक्ष चांगला आणि कुठला नाही? हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मला वाटलं होतं त्या अपेक्षेपेक्षा एक वर्ष सरकार जास्तच टिकलं असंही महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी तीन पक्षांना बांधून ठेवलं होतं मात्र हे सरकार कोसळणार याची कुणकुण आपल्याला लागली होती असंही महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सरकार २०१९ ला स्थापन झालं होतं. खरंतर २०१९ ला भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे दोन्ही पक्षांनी वाटून घेण्यावरून या दोन पक्षांचा वाद झाला. ज्यानंतर पुढचा परिणाम युती तुटण्यात झाला. युती तुटल्यानंतर शरद पवार आणि संजय राऊत या दोन नेत्यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचं सरकार आलं. उद्धव ठाकरे हे या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते.

२१ जून २०२२ ला मात्र शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात दंड थोपटले आणि बंड केलं. त्यांना शिवसेनेतल्या ४० आमदारांची साथ लाभली. त्यानंतर २९ जूनला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडलं. त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि ३० जूनला राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर आता महेश मांजरेकर यांचं वक्तव्य चर्चेत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT