अर्धा मिनीट उशीर झाला अन् दारं बंद झाली; आमदाराने सांगितले मतदानाला हजर न राहण्याचे कारण
मुंबई: एकनाश शिंदे (Eknath Shinde) यांचा गट आणि भाजपने आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. बहुमतासाठी झालेल्या (Maharashtra Floor Test) मतदानावेळी आम्हाला सभागृहात जाण्यासाठी फक्त अर्धा मिनीट उशीर झाला त्यामुळे विधानसभेची दारं बंद झाली आणि आम्हाला बाहेरच थांबावे लागले. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह जवळपास […]
ADVERTISEMENT

मुंबई: एकनाश शिंदे (Eknath Shinde) यांचा गट आणि भाजपने आज विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. बहुमतासाठी झालेल्या (Maharashtra Floor Test) मतदानावेळी आम्हाला सभागृहात जाण्यासाठी फक्त अर्धा मिनीट उशीर झाला त्यामुळे विधानसभेची दारं बंद झाली आणि आम्हाला बाहेरच थांबावे लागले. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह जवळपास १५ आमदार मतदानापासून वंचित राहिले.
या संदर्भात आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्याशी संपर्क केला असाता त्यांनी सर्व आपबिती सांगितली. आज विधानभवनात जवळपास १९ आमदारांनी मतदान केले नाही म्हणजे ते सभागृहात उपस्थीत नव्हते. त्याचबरोबर ३ आमदार तटस्थ राहिले आहेत.
संग्राम जगतापांनी (Sangram Jagtap) सांगितला घटनाक्रम...
सभागृहात उपस्थीत न राहण्यावरुन आमदार जगताप म्हणाले, आम्हाला सभागृहात जाण्यासाठी अवघा अर्धा मिनीट उशीर झाला, त्यामुळे विधानभवनाची दारं बंद झाली. आम्हाला एवढ्या वेळेत दरवाजे बंद करतील असे कधीच वाटले नव्हते यामुळे त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.