Mumbai Tak /बातम्या / नागालँडमधील यशानंतर आठवलेंचा भाजपला पाठिंबा जाहीर; नड्डांकडे मोठी मागणी
बातम्या राजकीय आखाडा

नागालँडमधील यशानंतर आठवलेंचा भाजपला पाठिंबा जाहीर; नड्डांकडे मोठी मागणी

Nagaland Assembly Election result 2023 :

मुंबई : गुरुवारी जाहीर झालेल्या ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालात नागालँडमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Aathwale) यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने झेंडा फडकवला आहे. इतिहासात पहिल्यांदाच आठवले यांच्या पक्षाने महाराष्ट्राबाहेर काही जागा जिंकल्या आहेत. नागालँडमधील (Nagaland Assembly Election result 2023) दोन जागांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (Republican Party of India) दोन आमदार निवडून आले आहेत. (Ramdas Athawale’s Republican Party of India has won two seats in Nagaland.)

नागालॅंडमध्ये RPI (A) च्या तिकिटावर Y. लिमा ओनेन चँग (Y. Lima Onen Chang) यांनी नागालँडमधील नोक्सेन (Noksen) जागेवरुन विजय मिळविला आहे. तर इम्तिचोबा (Imtichoba) यांनी तुएनसांग सदर-II (Tuensang Sadar-II seat) ही जागा जिंकली आहे. रिपब्लिकन पक्षाचे विनोद निकाळजे यांच्याकडे पक्षाच्या ईशान्येकडील कामकाज सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, या निकालानंतर आता आठवले यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला असून एका मंत्रिपदाचीही मागणी केली आहे.

‘आज तक’शी बोलताना आठवले म्हणाले, नागालँडमध्ये आमची भाजपसोबत युती नव्हती. आम्ही आमच्या बळावर ही निवडणूक लढवली होती. यात आम्ही ८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यातील आम्हाला ५ तरी जागा निवडून येतील हा विश्वास होता. पण तिथल्या मतदारांनी आम्हाला २ जागा दिल्या. आता आम्ही तिथं एनडीएचं समर्थन करु आणि सत्तेत सहभागी होऊ. याशिवाय मी आता जे. पी. नड्डांनाही भेटणार असून रिपब्लिक पक्षाचे आमदार त्यांच्यासोबत असल्याचं सांगणार आहे. तसंच तिथं आम्हाला एक मंत्रीपद मिळावं अशी मागणी करणार असल्याचही आठवले यांनी बोलताना सांगितलं.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीचाही झेंडा :

नागालँड विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाही मोठं यश मिळालं आहे. नागालॅंड (Nagaland) विधानसभेत राष्ट्रवादीला (NCP) ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर ५ जागांवर दुसऱ्या क्रमाकांची मतं मिळाली आहेत. त्याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांचा सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress) मात्र भोपळाही फोडता आलेला नाही. 

2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव