नागपूर महापालिका निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण जाहीर; तुमचा वार्ड कोणत्या प्रवर्गाला सुटलाय?
–योगेश पांडे, नागपूर भाजप वर्चस्व असलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण मंगळवारी (31 मे) जाहिर करण्यात आलं. नागपूर शहरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी शहराची लोकसंख्या, थेट महिला […]
ADVERTISEMENT

–योगेश पांडे, नागपूर
भाजप वर्चस्व असलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण मंगळवारी (31 मे) जाहिर करण्यात आलं.
नागपूर शहरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली.
सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी शहराची लोकसंख्या, थेट महिला आरक्षित जागा आणि प्रभागाची सविस्तर माहिती सादर केली. १२ मे रोजी निवडणूक आयोगाद्वारे प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप मंजुर करण्यात आलं.