Sharad Pawar: “छत्रपती शिवरायांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कुणीही केला नाही”

मुंबई तक

छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेएवढा अन्याय दुसऱ्या कुणीही केला नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. काही इतिहासकारांनी शिवचरित्राविषयी अर्धवट माहिती दिली त्यात बाबासाहेब पुरंदरे यांचाही समावेश होतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या हस्ते श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात करण्यात आलं. त्यावेळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेएवढा अन्याय दुसऱ्या कुणीही केला नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. काही इतिहासकारांनी शिवचरित्राविषयी अर्धवट माहिती दिली त्यात बाबासाहेब पुरंदरे यांचाही समावेश होतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या हस्ते श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बाबासाहेब पुरंदरे: ‘जाणता राजा’ कसं घडलं?, जाणून घ्या त्यामागची इंटरेस्टिंग कथा

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी?

काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अर्धवट माहिती दिली. काहींनी धादांत खोटी माहिती दिली. श्रीमंत कोकाटे यांनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. भारतात अनेक राज्यकर्ते झाले. मौर्यांचं राज्य होतं, अशोकाचं राज्य होतं, यादवांचं राज्य होतं. मात्र शिवाजी महाराजांचं राज्य यापेक्षा वेगळं होतं. कारण त्यांचं राज्य कधीही भोसल्यांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा म्हणून ओळखलं गेलं.

Babasaheb Purandare: तरुणांच्या मनावर राज्य करणारे बाबासाहेब पुरंदरे कोण होते?

हे वाचलं का?

    follow whatsapp