“एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात बेंबीच्या देठापासून ओरडणारे आज मात्र गोधडीत जाऊन झोपलेत” : अजित पवार

मुंबई तक

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या अस्सल शैलीत त्यांनी नाव न घेता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. आमच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात बेंबीच्या देठापासून शासनात विलनीकरण करा असं ओरडत होते. आझाद मैदानवर जाऊन झोपले होते. आता मात्र घरात गोधडीत झोपलेत, असा सनसनाटी टोला अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांच्या अस्सल शैलीत त्यांनी नाव न घेता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. आमच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात बेंबीच्या देठापासून शासनात विलनीकरण करा असं ओरडत होते. आझाद मैदानवर जाऊन झोपले होते. आता मात्र घरात गोधडीत झोपलेत, असा सनसनाटी टोला अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.

काय म्हणाले अजित पवार?

शनिवारी बीड येथील आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. चुन-चुनके मारेंगे, गिण-गिणके मारेंगे म्हणतात, गिणता तरी येत का? तुम्ही मारणार आणि बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. आमच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला त्यावेळी बेंबीच्या देठापासून ओरडत होते, सरकारी कर्मचारी करा, सरकारी कर्मचारी करा. आता काय झालं? तीन महिने झाले तुमच्या विचाराचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहे, सरकार तुमचं आहे. आता का गप्प झालात? कोणी अडवलं? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

‘आज घरात गोधडीत झोपलेत’- अजित पवार

हे वाचलं का?

    follow whatsapp