राष्ट्रवादी काँग्रेसवरती प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, म्हणाले महाविकास आघाडी सरकार…
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचं प्रकास आंबेडकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद नाही असंही आंबेडकर म्हणाले आहेत. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीनं पाडलं- प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी राष्ट्रवादी जबाबदार असल्याचं प्रकास आंबेडकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद नाही असंही आंबेडकर म्हणाले आहेत. ते सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार राष्ट्रवादीनं पाडलं- प्रकाश आंबेडकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केले आणि आपल्यासोबत सेनेचे ४० आमदार घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. आता ते सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादी काँग्रेसनं उचल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करायला एक पाऊल पुढे टाकले आहे, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत.
पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले ”नरेंद्र मोदींनी वाढदिवसाच्या दिवशी चित्ते सोडून दहशत पसरवली जात आहे. पंडीत नेहरुंनी कबुतरं सोडली होती मात्र त्यांनी ती वाढदिवसाच्या दिवशी सोडली नव्हती.” आंबेडकरांनी यावेळी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरतीही टीका केली आहे. ”भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे.” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदींवरतीही साधला निशाणा
प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवरतीही टीका केली आहे. दारुड्याला पैसे मिळाले नाही, तर तो घरातील भांडी विकतो अशी अवस्था नरेंद्र मोदींची झाली असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. वेदांता प्रोजेक्टबाबत, गुजरात आणि त्या कँपनीमध्ये करार झाला आहे, आता कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प परत येणार नाही, असं म्हणत आंबेडकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी फसवणूक बंद करावी आणि आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा.