Raj Thackeray : केतकी चितळेची शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका; राज ठाकरेंनी झापलं
अभिनेत्री केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना वापरलेल्या भाषेचा राज ठाकरेंनी एक निवेदन प्रसिद्ध करत समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांनी एका निवेदनातून या प्रकारवर भूमिका मांडली आहे. ‘कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना वापरलेल्या भाषेचा राज ठाकरेंनी एक निवेदन प्रसिद्ध करत समाचार घेतला आहे.
राज ठाकरे यांनी एका निवेदनातून या प्रकारवर भूमिका मांडली आहे. ‘कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वैगरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,’ असं राज यांनी म्हटलं आहे.
अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादात, शरद पवारांबद्दल फेसबुकवर टाकली पोस्ट
‘महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वैगरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशी टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत…! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरुर आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवार घालायला पाहिजे,’ असं भाष्य राज ठाकरे यांनी केलं आहे.