Mumbai Tak /बातम्या / ‘पवारांच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी…’, CM शिंदेंच्या सभेपूर्वीच रामदास कदमांचा ठाकरेंवर वार
बातम्या राजकीय आखाडा

‘पवारांच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी…’, CM शिंदेंच्या सभेपूर्वीच रामदास कदमांचा ठाकरेंवर वार

Ramdas Kadam criticize Sanjay Raut : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची आज खेडमध्ये सभा आहे.माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहे.काहीच दिवसांपुर्वी याच मतदार संघात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची सभा पार पडली होती.या सभेत त्यांनी शिंदे गटावर प्रहार केला होता. या ठाकरेंच्या सभेला शिंदे गट सभेच्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे. मात्र या सभेपुर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवारांच्या तुकड्यावरती कोण जगतंय, हे उभा देश पाहतोय, अशा शब्दात रामदास कदम यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच ही खेडमधली रेकॉर्ड ब्रेक सभा असेल आणि सर्व टीकाकारांना या सभेच्या माध्यमातून उत्तर दिला जाईल असा इशारा कदम यांनी दिला आहे. (ramdas kadam criticize sanjay raut udhhav thackeray Just before cm eknath Shinde’s meeting)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सभेपुर्वी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी कोटेश्वरी मानई देवीची पुजा करत साकडं घातलं. मुख्यमंत्री खेडमध्ये येतातय, त्यांनी माझ्या कोकणासाठी काहीतरी देऊन जाऊ देत, ही सभा राजकिय नको, तर या सभेचा लाभ माझ्या कोकणासाठी व्हावा, असे रामदास कदम म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक चांगले निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेत. निर्णयाचा सपाटाच त्यांनी लावलाय. केंद्रातून पैसा आणतायत आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतायत. माझा कोकण देखील विकासापासून लांब असता कामा नये, म्हणून देवीला साकडं घातलंय. एकनाथ शिंदेना सुबुद्धी दे, बुद्धी दे आणि चांगल्या निर्णयाची घोषणा त्यांच्याकडून होऊ देत,असे कदम यांनी सांगितले आहे.

‘चुंबन, भीती आणि ‘नाटू-नाटू’, संजय राऊतांची ‘रोखठोक’ टीका, कोणावर निशाणा?

मुख्यमंत्र्यांनी काहिच दिलं नाही….

खेडच्या सभेत उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) म्हणाले होते, माझ्या हातात काही नाही,मी खाली हाताने आलोय. खरं तर अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी पुष्कळस द्यायला हवं होतं, पण तेही त्यांनी दिले नाही,अशी टीका कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.

Exclusive : शिवसेना फक्त 50 जागा लढविणार? CM शिंदेंची स्ट्रॅटेजी काय?

ज्या शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती, 2014 साली. स्वाभिमानासाठी. 40-45 जणांवर तुकडे फेकलेले आहेत. यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील. ते तुकडे तोंडात ठेवूनच चघळत त्यांना जगावं लागेल. त्यांना कुठला स्वाभिमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा आधावर घेत शिंदे गटावर केली होती. यावर शरद पवारांच्या तुकड्यावरती कोण जगतंय, हे उभा देश बघतोय. ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते, असा टोला रामदास कदम यांनी हाणत, संजय राऊतांनी (Sanjay Raut) बोलाव हे हास्यास्पद असल्याची टीका केली.

शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती, संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?