Maharashtra Politics : रवी राणांनी मागितली माफी, बच्चू कडूंनी सस्पेन्स ठेवला कायम
‘५० खोके’च्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादावर आमदार रवी राणांकडून तरी पडदा टाकण्यात आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतल्यानंतर रवी राणांनी विधान मागे घेत माफी मागितली. पण, बच्चू कडूंनी अमरावतीत जाऊन भूमिका मांडणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे कडूंच्या मनात नेमकं काय, असा प्रश्न निर्माण झालाय. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतले असं […]
ADVERTISEMENT

‘५० खोके’च्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादावर आमदार रवी राणांकडून तरी पडदा टाकण्यात आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतल्यानंतर रवी राणांनी विधान मागे घेत माफी मागितली. पण, बच्चू कडूंनी अमरावतीत जाऊन भूमिका मांडणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे कडूंच्या मनात नेमकं काय, असा प्रश्न निर्माण झालाय.
बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतले असं विधान रवी राणांनी केलं होतं. त्यावरून बच्चू कडू आक्रमक झाले आणि हा वाद थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी म्हणत बच्चू कडूंनी थेट वेगवेगळा विचार करू असा इशाराच दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राणा-कडू वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.
शिंदे-फडणवीसांसोबत चर्चेनंतर राणांनी मागितली माफी
रविवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रवी राणा आणि बच्चू कडू यांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. तब्बल अडीच तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर सोमवारी सकाळी रवी राणा यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.