“हे एकदा फडणवीस यांनीच सांगावे; अमित शहा, बोला”, संजय राऊतांचा थेट सवाल

मुंबई तक

Sanjay Raut । amit Shah । Devendra Fadnavis । ED-CBI: विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध ईडी, सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया तीव्र झाल्या आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआय, ईडीकडून अटक झाली असून, माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sanjay Raut । amit Shah । Devendra Fadnavis । ED-CBI: विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध ईडी, सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया तीव्र झाल्या आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआय, ईडीकडून अटक झाली असून, माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात धाडसत्र आणि चौकशी सुरू आहे. याच प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. (MP Sanjay Raut Hits out Union Home Minister Amit Shah And Devendra Fadnavis over Ed, CBI Raids)

संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून पुन्हा एकदा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. संजय राऊत यांनी थेट अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना यावरून काही सवाल केले आहेत.

अमित शाहांचा पत्रकारांसोबत संवाद, राऊत म्हणाले, ‘अमित शाह, बोला’

संजय राऊत म्हणतात, “2019 पर्यंत भाजपच्या लेखी नारायण राणे भ्रष्ट व चोर होते. आज ते भाजपचे आदरणीय केंद्रीय मंत्री झाले. हेमंत बिस्वा सर्मा हे आता मोदी-शहांच्या अंतस्थ गोटातील मोहरा बनले आहेत. काँग्रेस पक्षातून ते भाजपात आले व आता मुख्यमंत्री बनले. काँग्रेस मंत्रिमंडळात असताना हेमंत बिस्वा सर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने लावले होते. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची एक पुस्तिकाच भाजपने पुराव्यासह प्रसिद्ध केली होती. आसाममधील पाणीपुरवठा खात्यात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला. Water Supply Scam म्हणून हा भ्रष्टाचार तेव्हा गाजला. हेच हेमंत बिस्वा सर्मा भाजपमध्ये जाताच त्यांची सगळी पापे भाजपने धुऊन घेतली.”

“आसामच्या ताज्या दौऱ्यात पत्रकार व अमित शहा यांच्यातील मजेशीर संवाद पहा-

हे वाचलं का?

    follow whatsapp