NCP: राष्ट्रवादी कुणाची? कोणी घेतला निकालाआधीच निवडणूक आयोगावर संशय? - Mumbai Tak - sharad pawar vs ajit pawar whos ncp jitendra awhad doubt on the election commission decision - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

NCP: राष्ट्रवादी कुणाची? कोणी घेतला निकालाआधीच निवडणूक आयोगावर संशय?

अजित पवार गटाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी दिली होती.यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना दिले जाईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला होता. प्रफुल पटेलांच्या या विधानानंतर आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे.
Updated At: Aug 30, 2023 09:50 AM
sharad pawar vs ajit pawar whos ncp jitendra awhad doubt on the election commission decision

राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही आहे. मात्र येत्या 30 सप्टेंबरपर्यंत निकाल येणे अपेक्षित असल्याची माहिती अजित पवार गटाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी दिली होती.यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना दिले जाईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला होता. प्रफुल पटेलांच्या या विधानानंतर आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे. (sharad pawar vs ajit pawar whos ncp jitendra awhad doubt on the election commission decision)

काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे.आणि आमदारांच्या पाठिंब्याच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना दिले जाईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी आता निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या सुरुवातीला जितेंद्र आव्हाडांनी प्रफुल पटेल यांचे विधान लिहले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची निशाणी ही आम्हांलाच मिळणार आणि ती देखील 30 सप्टेंबरच्या अगोदर..असे आव्हाडांनी लिहले आहे.

आतापर्यंत मॅच फिक्सिंग ऐकलं होतं, पण आता निवडणूक आयोगातही फिक्सिंग होत आहे, हा सर्वात मोठा पुरावा असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. अशा वक्तव्यांमुळे निवडणूक आयोगाची भूमिका ही संशयास्पद वाटते, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. या देशामध्ये संस्थांचे स्वातंत्र्य जिवंत आहे की नाही? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

प्रफुल पटेल काय म्हणाले?

राष्ट्रवादी पक्षाबाबत येत्या 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय येणे अपेक्षित असल्याचा दावा प्रफुल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोकांच्या मनात शंका, राष्ट्रवादी पक्ष हा खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे.मी तुम्हाला आवर्जुन सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे.आणि आमदारांच्या पाठिंब्याच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार यांना दिले जाईल, असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला आहे. प्रफुल पटेल (Praful Patel) बीडच्या सभेत बोलत होते.

Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात चिकन खा अन् Weight Loss करा! कमी वयात IAS-IPS झालेल्या 5 तरुणांची प्रेरणादायी कहाणी स्वत:साठी फक्त 5 मिनिटे काढा अन् दिवसाची सुरूवात ‘या’ 8 योगा स्टेप्सने करा! झटपट Weight Loss करायचंय? मग ‘हे’ 8 Snacks खाऊनच बघा… ‘गाव की गोरी बनली, शहर की छोरी’; अभिनेत्रीने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन अभिनेत्रीचा फुल ऑन फायर हॉट फिगर; कारण फॉलो करते ‘हा’ Diet Plan 162 किलोच्या IT इंजिनिअरने घटवलं 65 किलो वजन; कोणता सीक्रेट डाएट केला फॉलो? Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर ‘हा’ डाएट करा फॉलो या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण?