Shivsena | Aditya Thackeray :
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सोमवारी (२७ फेब्रुवारी) सुरुवात झाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि शिवसेना (Shivsena) मिळाल्यानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. याशिवाय जवळपास ३ वर्षांनंतर मोठ्या कालावधीचे अधिवेशन होत आहे. त्यामुळेच या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) लक्ष लागून राहिले आहे. अशात शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्षाची झलक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाला. (Shivsena leader vs thackeray group conflict in Maharashtra Legislative Assembly)
शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी व्हिप जारी
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. अधिवेशन कालावधीत सर्व दिवस आमदारांनी उपस्थित राहण्यासंदर्भातील हा व्हिप आहे.
व्हिप डावलल्यास कारवाई होणार?
कायद्याप्रमाणे पक्षादेश न पाळल्यास पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होण्याचा धोका असतो. मात्र हा व्हिप न पाळल्यास कोणतीही कारवाई होणार नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याच कारण सर्वोच्च न्यायालयाची दोन आठवड्यांची मर्यादा.
Saroj Ahire: आजारी बाळ, डोळ्यात अश्रू; आमदार अहिरे शिंदे-फडणवीसांवर भडकल्या
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. तर या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणात न्यायालयाने निवडणूक आयोगाला आणि शिंदे गटाला नोटीस बजावली आहे. याची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. मात्र यादरम्यान पुढील दोन आठवडे कोणताही व्हिप बजावणार नसल्याचं शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं होतं.
Crime: माहेरी आलेल्या प्रेयसीला घरात बोलावलं अन्.., प्रियकराच्या कृत्यानं सातारा हादरलं
आम्हाला व्हिप मिळालेला नाही, सुनील प्रभूंनी दिलं उत्तर :
शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिप बजावला आहे. त्यावरून सुनील प्रभू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सुनील प्रभू म्हणाले, “आम्हाला अजूनही व्हिप मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं की आम्ही व्हिप बजावणार नाही. असं असतानाही त्यांनी व्हिप बजावला, तर आम्ही न्यायालयात जाऊ. सभागृहात उपस्थित राहण्याबद्दल जो व्हिप असेल, तो आम्ही काढू. ते आमच्यावर बजावू शकत नाही. त्यांनी तसं न्यायालयात सांगितलेलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यात नंतर कळेल. जे योग्य असेल ते करू, असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला आहे.