Sanjay Raut : तुरुंगातील एक-एक तास शंभर दिवसांसारखा असतो; राऊतांनी सांगितला 'आतील' अनुभव

'मुंबई तक'ला दिलेल्या विषेश मुलाखतीमध्ये संजय राऊतांनी सांगितल्या आठवणी
Sanjay Raut
Sanjay RautMumbai Tak

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत जवळपास 100 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांचे दौरे, भेटीगाठी हे नियमीत सुरु झालं आहे. मात्र या सगळ्यात ते अजूनही तुरुंगातील आठवणी विसरलेले नाहीत. तुरुंगातील एक एक तास हा 100 दिवसांसारखा असतो, असं म्हणतं त्यांनी तुरुंगातील आठवणी सांगितल्या आहेत. मुंबई तकला दिलेल्या विषेश मुलाखतीमध्ये संजय राऊत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, मी अंडा सेलमध्ये होतो. अगदी हाय सिक्युरीटी. तुरुंगाचे नियम असतात त्यानुसार राहायचं असतं. त्यामागे सुरक्षेची काही कारण असतात. २४ तास अशी प्रखर लाईट चालू असते. त्यातच झोपायचं, त्यातचं वावरायचं. डोळ्याला त्रास होतो. अनेक गोष्टी असतात अशा. जमीन खडबडीत असते, त्यावर लहानसं काही तरी टाकून झोपावं लागतं. पण आम्ही सहन केलं, अशा कटू आठवणी त्यांनी सांगितल्या.

पहा संपूर्ण मुलाखत :

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in