Karnataka Election 2023: आप कुणाला देणार ताप? अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर आप आदमी पार्टीने मोठी घोषणा केली आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती दिली.
ADVERTISEMENT
Arvind Kejriwal say’s aam aadmi party contest in karnataka assembly election 2023 : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही दंड थोपटले आहेत. आम आदमी पार्टीने कर्नाटकातील सर्व जागा लढवण्याची घोषणा केली आहे. (aap will contest all seats in karnataka assembly election )
ADVERTISEMENT
आम आदमी पार्टी कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी फार पूर्वीपासून करत आहे. आपने कर्नाटकात पक्ष बांधणी केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रॅलीही केली आहे. त्यामुळे असं म्हटलं जात होतं की, आम आदमी पार्टी कर्नाटकात काँग्रेस आणि भाजपसमोर आव्हान निर्माण करू शकते. आता त्याच दृष्टीने आपने पहिलं पाऊल टाकलं आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक : चार पक्षांमध्ये लढाई
अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्व जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तीन नव्हे तर चार पक्ष आमने सामने असणार आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध जेडीएस विरुद्ध आम आदमी पार्टी अशी चौरंगी लढत बघायला मिळणार आहे.
हे वाचलं का?
80 जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आप आदमी पार्टीने आधीच बाजी मारली आहे. आपने आतापर्यंत 80 जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने आतापर्यंत उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. सध्या तरी इतर पक्षामध्ये उमेदवारांच्या नावावरून खलबतं सुरू आहेत. विकासाच्या दिल्ली मॉडेलवर कर्नाटकातील मतदारांसमोर जाणार असल्याचे आपकडून सांगितलं जात आहे.
आपचे दिल्ली मॉडेल कर्नाटकमध्ये यश मिळवून देणार का?
आम आदमी पार्टीने आतापर्यंत दिल्लीसह पंजाब, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये निवडणूक लढवली आहे. आपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्येही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीनंतर आपला पंजाबमध्ये सर्वाधिक फायदा झाला असून, बहुमताने सरकार स्थापन केलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा – karnataka election 2023 date: कर्नाटकात बिगुल वाजला! 13 मे रोजी ‘निकाल’
गुजरातमध्ये आम आदमी पार्टीने पूर्ण ताकद लावली होती, मात्र भाजपसमोर फार टिकाव धरू शकली नाही. आता कर्नाटकात आपने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. कर्नाटकमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत असून, त्यात आम आदमी पार्टी उतरल्याने याचा फटका कुणाला बसेल, आणि आपचे विकासाचे दिल्ली मॉडेल कर्नाटकात किती यश मिळवून देणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT