सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधीच आदित्य ठाकरे भेटले राज्यपालांना.. प्रकरण नेमकं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

aditya thackeray meet governor ramesh bais verdict before supreme court
aditya thackeray meet governor ramesh bais verdict before supreme court
social share
google news

Aditya Thackeray Meet Governor Ramesh Bais : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर येत्या काही दिवसात सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. या निकालाकडे संपू्र्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष असतानाचा आता ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. दरम्यान या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे जाणून घेऊयात. (aditya thackeray meet governor ramesh bais verdict before supreme court what was in the case)

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार आमदार यांनी राज्यपाल रमेश बैस यांची आज भेट घेतली.या भेटीत आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील कथित घोटाळ्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या घोटाळ्यांची सविस्तर माहिती दिली.

सुप्रीम कोर्टाच्या निकालावर काय म्हणाले ?

मी निकालावर काहीच बोलत नाही आहे. आम्हाला न्याय देवतेवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. जर अशी गद्दारी आपल्या महाराष्ट्रात घडलीय ती दुर्लक्ष करत गेलो तर उद्या राजकीय अस्थिरता निर्माण होईल,असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच राहुल नार्वेकर यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. ते घटनाबाह्य अध्यक्ष बसले आहेत का? असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ठाकरे-शिंदेंच्या लढाईचा उद्या ‘सुप्रीम’ फैसला!

गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेतील अनेक भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले.आता रस्ते घोटाळा असो, खडीचा घोटाळा आणि स्किट फर्निचरचा घोटाळा या घोटाळ्यांची माहिती आज राज्यपालांना दिली. हे घोटाळे सध्याचे प्रशासक आणि त्यांच्या अंदाधुंद कारभारामुळे सुरु असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबईत 6 हजार कोटीचा रस्ते घोटाळा होतोय. केवळ 40 टक्के आणि 60 टक्के कंत्राटदार चालवत आहेत. 400 किलोमीटरचे रस्ते करत असताना साधारणपर्यंत आता पर्यतचे जे रेट असायचे, 5 कत्राटदारांना 5 पॅकेट दिलेत. यामध्ये 66 टक्के वाढ करून कंत्राटदारांना फायदा होतोय, या प्रकरणात प्रशासकाकडून कारवाई होत नाहीय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ’16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय फिरवू शकत नाही’, संजय राऊतांचं विधान

पुण्यात रेव घोटाळा ज्यात स्पेअऱ पार्टच्या दरात कमालीची वाढ करण्यात आलीय. फर्निचर घोटाळा झाला आहे. कंत्राटदार मित्रासाठी स्ट्रिट फर्निचरचे काम काढले आहे,अशी माहिती देखील आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच वेताळ टेकडी सपाट करणे आणि पुण्यातील नद्या प्रदुषित करणे या प्रश्नाकडे सरकारी अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. अनेक स्वयंसेवी संस्था त्यासाठी लढा देत आहेत पण सरकार आपल्या अधिकाराचा उघडपणे वापर करत असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिंदेवर टीका

सीएम हे करप्ट मॅन आहेत. मुख्यमंत्री कधी शेतात, कधी गुवाहाटी पळतात, पण मला उत्तर देण्याची तयारी दाखवत नाही,अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी आज या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी लोकायुक्तांमार्फत करावी अशी मागणी राज्यपाल बैस यांच्याकडे केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT