Maharashtra Political Crisis : ठाकरे-शिंदेंच्या लढाईचा उद्या 'सुप्रीम' फैसला! - Mumbai Tak - supreme court will deliver judgment on maharashtra political crisis on 11 may - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Maharashtra Political Crisis : ठाकरे-शिंदेंच्या लढाईचा उद्या ‘सुप्रीम’ फैसला!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ 11 मे रोजी निकाल देणार आहे.
Uddhav Thackeray vs Eknath shinde : supreme court verdict on maharashtra political crisis on 11 may

Surpeme court judgement on Maharashtra political crisis : ज्या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागलं आहे, त्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकालाची तारीख अखेर ठरली! सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ 11 मे रोजी या प्रकरणावर निकाल देणार आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर लढाईत कुणाचा जय होणार, यामुळे उत्सुकता वाढली आहे. (Supreme Court Constitution Bench to deliver the judgment in ShivSena case tomorrow, says CJI DY Chandrachud)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर धनुष्यबाण आणि शिवसेना नावही ठाकरेंना गमवावं लागलं.

शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात सुरू झालेला राजकीय सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात गेला. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रमुख मुद्द्यासह इतर मुद्द्यांवरील याचिकांच हे प्रकरण सुप्रीम कोर्टाने पाच सदस्यी घटनापीठाकडे पाठवलं. त्यानंतर या प्रकरणावर सुर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सलग सुनावणी झाली.

वकिलांची तगडी फौज, कायद्याचा पडला किस

उद्ध ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केलेला आहे. तर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे, एन. के. कौल, महेश जेठमलानी आणि सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वतीने युक्तीवाद केला. तर मनिंदर सिंग यांनी विधानसभा अध्यक्षांच्या वतीने युक्तिवाद केला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : या प्रश्नांची मिळणार उत्तरं…

-एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेत मोठ बंड झालं. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रकरणावर पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ निकाल देणार आहे.

-विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबद्दल अपेक्षित महत्त्वाचा निकाल आणि सभापतींना हटवण्याची मागणी करणारी पूर्वसूचना सभागृहासमोर प्रलंबित असल्यास आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर पुढे जावे की नाही, यासंदर्भात हा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे.

-पक्षांतर, विलीनीकरण आणि दहाव्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेशी संबंधित अनेक महत्त्वाचे घटनात्मक प्रश्नांची उत्तरं या प्रकरणाच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून मिळणार आहे.

-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगण्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्या निर्णयाच्या वैधतेबद्दलही निकालात स्पष्टता असू शकते.

-एकट्या विधीमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या एका गटाचा पाठिंबा असलेल्या गटाला पक्ष म्हणता येईल का, याचं उत्तरही सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने मिळणार आहे.

आमदारकी संकटात असलेले ते 16 आमदार कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (आमदार, कोपरी-पांचपाखाडी)
तानाजी सावंत (आमदार, भूम परंडा)
अब्दुल सत्तार (आमदार, सिल्लोड)
यामिनी जाधव (आमदार, भायखळा)
संदीपान भुमरे (आमदार, पैठण)
भरत गोगावले (आमदार, महाड)
संजय शिरसाठ (आमदार, छत्रपती संभाजीनगर पश्चिम)
लता सोनावणे (आमदार, चोपडा)
प्रकाश सुर्वे (आमदार, मागाठाणे)
बालाजी किणीकर (आमदार, अंबरनाथ)
बालाजी कल्याणकर (आमदार, नांदेड उत्तर)
अनिल बाबर (आमदार, खानापूर)
संजय रायमूलकर (आमदार, मेहेकर)
रमेश बोरनारे (आमदार, वैजापूर)
चिमणराव पाटील (आमदार, एरोंडोल)
महेश शिंदे (आमदार, कोरेगाव)

Janhvi Kapoor: अ‍ॅडल्ट साइटवर होता जान्हवी कपूरचा फोटो… राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका!