लाल रंगाच्या खोक्यात तुटलेले दात, चॉकलेट्स अन् 8 वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह

मुंबई तक

Crime News : अल्पवयीन मुलाचा मृतदेह लाल रंगाच्या पेटीत आढळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका पेटीत मृतदेहासह चिप्स पाकीट. चॉकलेट्स आणि क्रिस्प्स आढळून आल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलाचा मृतदेह लाल रंगाच्या पेटीत

point

मुलाचा डोळा आणि काही दात तुटल्याची घटना

Crime News : उत्तर प्रदेशातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह लाल रंगाच्या पेटीत आढळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका पेटीत मृतदेहासह चिप्स पाकीट. चॉकलेट्स आणि क्रिस्प्स आढळून आल्याची माहिती आहे. या घटनेवरून तांत्रिक विधीचा भाग म्हणून मुलीची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. नेमकं त्या दिवशी काय घडलं ते जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : नेते ते अभिनेते.. AI च्या 'या' ट्रेंडने लावलंय सर्वांनाच वेड, कसे बनवाल 80s च्या हिरो-हिरोईनसारखे फोटो?

निष्पाप बाळाच्या मृत्यूमागील रहस्य

एका निष्पाप बाळाच्या मृत्यूमागील रहस्य उलगडण्यासाठी बरेलीच्या एसएसपींनी चार पोलिसांचे पथक तैनात केली होती. तीन डॉक्टरांचे पथक बाळाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणार असल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. निष्पाप बाळाचा मृतदेह सापडल्याने दिल्लीच्या-लखनौ महामार्गावरील इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात एकच खळबळ माजली होती. 

मुलाचा डोळा आणि काही दात तुटल्याची घटना

मुलाच्या मृतदेहासोबत एका बॉक्समध्ये चिप्स, कुरकुरे आणि चॉकलेट्स आढळून आले होते. एवढंच नसून मुलाचा डोळा आणि काही दात देखील तुटल्याची घटना समोर आली. तांत्रिक विधीचा भाग म्हणून मुलीची हच्या केली आणि मृतदेह नदीत फेकून देण्याच्या उद्देशाने  एका बॉक्समध्ये नदीकिनारी आणण्यात आला, संबंधित प्रकरणात असा संशय व्यक्त करण्यात आलाय. 

हे ही वाचा : ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ बनवून धमकावलं

दरम्यान, पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नंतर शवविच्छेदनासाठी पाठवला होता. अशातच बरेलीच्या एसपींनी मुलाच्या हत्येमागील गुढ उकलण्यासाठी चार पोलिसांचे पथके तैनात केली आहेत. मुलाच्या मृत्यूमागील गुढ लवकरच उलगडेल, असा दावा करण्यात आल्याची माहिती आहे.