नेते ते अभिनेते.. AI च्या 'या' ट्रेंडने लावलंय सर्वांनाच वेड, कसे बनवाल 80s चा हिरो-हिरोईनसारखे फोटो?
80s AI Photo Filter Trend म्हणजे काय? ChatGPT वापरून तुमचा फोटो १९८०च्या दशकातील रेट्रो लूकमध्ये कसा बदलायचा, कोणता Prompt वापरायचा आणि फोटो तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

मुंबई: इन्स्टाग्रामवर सध्या ८०च्या दशकातील जुन्या फोटोसारखे दिसणारे AI फोटो व्हायरल होत आहेत. साध्या सेल्फीला रेट्रो कपडे, मोठी हेअरस्टाईल, जुन्या काळातील प्रकाशयोजना आणि फिल्मचा टेक्स्चर देऊन हा लूक तयार केला जातो. या ट्रेंडनुसार, नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सगळेच जण आपला 80 च्या दशकात कसे असू याचा फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहे. पण हा नेमका ट्रेंड काय आहे आणि स्वतःचा फोटो कसा बनवायचा? याबाबत जाणून घेऊया सविस्तरपणे.
80s AI Photo Filter Trend म्हणजे काय?
हा ट्रेंड म्हणजे AI च्या मदतीने तुमच्या सध्याच्या फोटोला १९८०च्या दशकातील फोटोचा लूक देणे. यात केवळ जुन्या फोटोसारखा रंग लावला जात नाही, तर कपडे, हेअरस्टाईल, दागिने, बॅकग्राऊंड, प्रकाशयोजना आणि फोटोचा एकूण पोत बदलला जातो. त्यामुळे फोटो एखाद्या जुन्या फॅमिली अल्बममधून, बॉलिवूडच्या फोटोशूटमधून किंवा ८०च्या दशकातील स्टुडिओमधून काढल्यासारखा दिसू शकतो.
हे ही वाचा>> मुंबईची खबर : आरोग्य सेवांसंबंधी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
सोशल मीडियावर एवढा व्हायरल का होतोय?
- नॉस्टॅल्जिया: जुन्या काळातील फॅशन, सिनेमा आणि फोटोग्राफीची आठवण.
- AI ची क्रिएटिव्हिटी: स्वतःचा फोटो पूर्णपणे वेगळ्या काळात कल्पना करता येतो.
- वैयक्तिक लूक: बॉलिवूड पोर्ट्रेट, लग्नाचा अल्बम, डिस्को किंवा जुन्या स्टुडिओसारखे वेगवेगळे पर्याय.
- शेअर करणे सोपे: फोटो तयार झाल्यानंतर तो Instagram Stories, Reels किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करता येतो.
स्वतःचा 80s AI फोटो कसा तयार करायचा?
1. स्पष्ट फोटो निवडा
चेहरा स्पष्ट दिसणारा, चांगल्या प्रकाशातील फोटो वापरा. चेहऱ्यावर जास्त फिल्टर, गॉगल किंवा टोपी नसलेला फोटो निवडल्यास चेहऱ्याचे साम्य टिकवणे सोपे होते.
