Govt Jobs : भारत सरकारच्या विमा कंपनीत नोकरीची संधी, लगेच अर्ज करा

मुंबई तक

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 सप्टेंबर आहे. यासाठी अर्ज कसा करावा?

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
Google CTA

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : भारत सरकारच्या विमा कंपनीत नोकरीची संधी

point

लगेच अर्ज करा

Government Jobs : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIICL) मध्ये प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण 225 जागांसाठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत जनरलिस्ट वर्गासाठी 200 जागा तर हिंदी ऑफिसर साठी 25 जागा भरल्या जाणार आहेत. संपूर्ण भारतामध्ये सेवा बजावण्यास उत्सुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. जनरलिस्ट पदासाठी उमेदवाराकडे किमान 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे (अराखीव वर्ग), तर अनुसूचित जाती/जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी 55% गुणांची अट आहे. हिंदी ऑफिसर पदासाठी इंग्रजी विषयासह हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी किमान 60% गुणांसह (आरक्षित वर्गासाठी 55%) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच, 30 जून 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे; यामध्ये अनुसूचित जाती/जमातीतील उमेदवारांना 5 वर्षे आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सूट देण्यात आली आहे.

हे ही वाचा : ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ बनवून धमकावलं

पगार किती मिळणार?

निवड झालेल्या उमेदवारांना 82,485 ते 1,56,745 या वेतनश्रेणीनुसार मूळ वेतन दिले जाईल. महानगर शहरांमध्ये इतर देय भत्ते, वैद्यकीय सुविधा, ग्रॅच्युइटी, एनपीएस (NPS) आणि घरभाडे भत्त्यासह उमेदवाराला सुरुवातीला सुमारे रु. 1,10,000 प्रतिमहिना एकूण वेतन (Gross Pay) मिळेल. या भरतीकरिता अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गासाठी 1000 रुपये असून, अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक व महिला उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आकारले जाईल.

हे ही वाचा : चलाख सुनेनेच रडून फसवलं! चाकूचे 26 वार, सासऱ्याची निघृण हत्या

परीक्षा कधी होणार?

इच्छुक व पात्र उमेदवारांना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून (uiic.co.in) 28 सप्टेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. या भरतीसाठीची पूर्व परीक्षा (Tier I) 22 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित केली जाणार असून मुख्य परीक्षा (Tier II) 30 नोव्हेंबर रोजी पार पडेल. योग्य पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.