नवरा छळायचा, तरुणाकडून मिळालं प्रेम; हादरवून टाकणारा शेवट

मुंबई तक

एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं आहे. नवरा दररोज दारु पिऊन तिला छळायचा. अशातच तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. उत्तर प्रदेशातील ही घटना आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवरा दारु पिऊन दररोज छळायचा

point

तरुणाकडून मिळालं प्रेम

point

हादरवून टाकणारा शेवट

Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे.  हरिशचंद्र अग्रहरी या ई-रिक्षा चालकाच्या हत्येचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधांच्या अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी खुद्द पत्नीनेच आपल्या प्रेमीसोबत मिळून सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत ई-रिक्षा चालकाची पत्नी माया देवी, तिचा प्रेमी नियाज अहमद आणि सुपारी घेऊन हत्या करणारे इरशाद व अब्दुल्ला या चौघांना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील ही घटना आहे.

नवरा छळायचा, तरुणाकडून मिळालं प्रेम

घटनेची पार्श्वभूमी अशी की, मृत हरिशचंद्र हा दारूच्या आहारी गेला होता आणि दारूच्या नशेत रोज पत्नी माया देवीला बेदम मारहाण करत असे. पतीच्या या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या माया देवीचे नियाज अहमद नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले. यानंतर दोघांनी मिळून हरिशचंद्रला कायमचे मार्गातून हटवण्याचा कट रचला. या कटाचा भाग म्हणून नियाजने आपले दोन साथीदार इरशाद आणि अब्दुल्ला यांना हरिशचंद्रच्या हत्येसाठी 1 लाख 10 हजार रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी 60 हजार रुपये आरोपींना ॲडव्हान्स म्हणून देण्यात आले होते.

हे ही वाचा : चलाख सूनेनेच रडून फसवलं! चाकूचे 26 वार, सासऱ्याची निघृण हत्या

अशी केली हत्या

कटाची अंमलबजावणी करण्यासाठी आरोपींनी प्रथम मोबाईल फोनवरून हरिशचंद्रची ई-रिक्षा बुक केली. त्यानंतर त्याला एका नदीजवळील निर्जन स्थळी नेऊन चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला आणि ही घटना अपघाती वाटवी म्हणून ई-रिक्षा रस्त्याच्या कडेला लटकवून ठेवली. मात्र, शवविच्छेदन अहवालात हरिशचंद्रची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रं फिरवली.

हे ही वाचा : MPSC Protest Pune : पेपरफुटीच्या तपासात काय सापडलं? पुण्यातील मोर्चाची स्टोरी

जलद गतीने तपास केला म्हणून...

तपासादरम्यान मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी 8 सप्टेंबर 2026 रोजी माया देवी, तिचा प्रेमी नियाज अहमद आणि दोन्ही सुपारी किलर्स अशा चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. अटकेनंतर आरोपींच्या सांगण्यावरून हत्येत वापरलेला चाकू आणि मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा यशस्वी आणि जलद गतीने खुलासा केल्याबद्दल तपास पथकाला 20 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.