MPSC Protest Pune : पेपरफुटीच्या तपासात काय सापडलं? पुण्यातील मोर्चाची स्टोरी
mpsc protest pune paper leak investigation : MPSC विद्यार्थ्यांच्या पुण्यातील आक्रोश मोर्चात परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि पेपरफुटीच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणातील 77 प्रश्न, आर्थिक व्यवहार आणि तपासातील धागेदोऱ्यांवर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
MPSC Protest Pune : पेपरफुटीच्या तपासात काय सापडलं?
पुण्यातील मोर्चाची स्टोरी
mpsc protest pune paper leak investigation : पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांनी पेपरफुटी प्रकरण आणि परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढला. आयोगाच्या अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली. याशिवाय गट ब परीक्षेतील आक्षेपांवर आठ दिवसांत स्पष्टीकरण द्यावे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 आणि कृषी सेवा परीक्षेतील वर्णनात्मक पेपर तपासणीतील चुकांची चौकशी करावी. तसेच मुंबई क्राईम ब्रँचकडून आयोगाला देण्यात आलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. अटकेत असलेले आरोपी आणि अवर सचिव अभिजीत लेंडवे यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणीही करण्यात आली.
हेही वाचा : फ्लाईंग किस, अश्लील हावभाव, दहीहंडीचा उत्सव या थराला का गेला? अविनाश जाधव EXCLUSIVE
वाशीच्या खाडीत लॅपटॉप फेकल्याचा संशय, आता तज्ज्ञांकडून रिकव्हरी सुरु
अन्न आणि औषध प्रशासनाच्या ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेतील पेपरफुटीच्या तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. MPSC अधिकारी नखाते यांनी वाशीच्या खाडीत लॅपटॉप फेकल्याचा संशय होता. हा लॅपटॉप क्राईम ब्रँचने हस्तगत केला असून, त्यातील डेटा मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. आतापर्यंत मिळालेल्या प्रश्नांच्या यादीपैकी 294 पैकी 77 प्रश्न प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत आले असून, त्यांचे पर्यायही हुबेहूब जुळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्याचे तपासात स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा : फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचा बळी घेतला, आपण बदला नक्की घेऊ; जरांगेंचं थेट आव्हान
