धक्कादायक... MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाने पुण्यात संपवलं जीवन!

मुंबई तक

MPSC ची तयारी करणाऱ्या धाराशिवच्या प्रथमेश देशमुख या तरुणाचा पुण्यात मृत्यू झाला. कर्जबाजारीपणा, शेतीचे नुकसान आणि आर्थिक अडचणींच्या आरोपांनंतर नारायण पेठ पोलिसांचा तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

dharashiv mpsc aspirant prathamesh deshmukh suicide pune khapuri
MPSC Aspirant Dies in Pune
Google CTA

गणेश जाधव, धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी येथील MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा पुण्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खासापुरी गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

कर्ज आणि शेतीच्या नुकसानीचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश देशमुख पुण्यात राहून MPSC परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या डोक्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतातील सोयाबीन पीक जळून गेल्याने तो आर्थिक अडचणीत होता, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी केला आहे.

हे ही वाचा>> अमित ठाकरेंनी PM मोदींचा फोटो हटवला अन् आज 'या' महानगरपालिकेत तुफान राडा

प्रथमेशच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. प्रथमेशला पाच बहिणी असून, कुटुंबाची जबाबदारीही त्याच्यावर होती. त्यामुळे शिक्षण, स्पर्धा परीक्षेची तयारी आणि आर्थिक परिस्थिती याचा ताण त्याच्या आयुष्यात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

MPSC ची तयारी करताना दोन प्रयत्न

प्रथमेशने MPSC परीक्षेसाठी यापूर्वी दोन वेळा प्रयत्न केले होते. मात्र, स्पर्धा परीक्षांमधील अनिश्चितता, आर्थिक अडचणी आणि शेतीचे नुकसान यामुळे तो मानसिक तणावाखाली असावा, असा दावा नातेवाईक आणि गावकऱ्यांनी केला आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.