आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोले शिंदेंसोबत; पत्र लिहून काय केले आरोप?
आदित्य ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय माजी नगरसेवक अमेय घोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय माजी नगरसेवक आणि युवासेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले (Ameya Ghole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये घोले यांनी आज (सोमवारी) शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून घोले यांच्या शिवसेना प्रवेशाविषयीच्या चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहून घोले यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. (Aditya Thackeray’s close aide and Yuva Sena treasurer Ameya Ghole resigns form his post and join CM Eknath Shinde’s Shiv Sena)
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अमेय घोले यांनी काय म्हटलं आहे?
प्रिय आदित्यजी,
“मी राजकारणात आलो तुमच्यामुळे, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला युवा सेनेच्या माध्यमातून संधी दिली. तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी मी गेले १३ वर्ष अत्यंत प्रामाणिकपणाने पार पाडली.
हे वाचलं का?
परंतु वडाळा विधानसभा मतदारसंघात काम करत असताना महिला संघटक श्रद्धा जाधव आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांनी माझ्या कामात वारंवार अडथळे आणायचा प्रयत्न केला, त्यामुळे मला काम करताना खूप त्रास व मनस्ताप झाला.
जय महाराष्ट्र !!! @AUThackeray 🙏 pic.twitter.com/tYl9gk1P5J
— Amey Ghole (@AmeyGhole) April 17, 2023
ADVERTISEMENT
याबाबत मी आपल्याला वेळोवेळी माहिती दिली होती. संघटनेतील काही मतभेद दूर व्हावे व मला सुरळीतपणे माझे कार्य सुरू ठेवता यावे म्हणून मी खूप प्रयत्न केला. परंतु काही कारणास्तव यावर काहीच मार्ग काढला गेला नाही.
ADVERTISEMENT
त्यामुळे आज अखेरीस जड अंतःकरणाने मला युवासेना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. सांगण्यास अत्यंत दुःख होत आहे की आज मी माझ्या युवासेनेच्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.
आदित्यजी आपली मैत्री ही केवळ राजकारणापुरती नाही. तुमच्या बरोबरचा संघटनेतील माझा प्रवास थांबवत असलो तरी आपली मैत्री कायम राहावी हीच अपेक्षा व्यक्त करतो”
कार्यक्रम रद्द, आमदारांची बैठक? अखेर मौन सोडत अजित पवार स्पष्टच बोलले…
कोण आहेत अमेय घोले?
अमेय घोले हे मुंबईतील वडाळा भागातील माजी नगरसेवक आहेत. ते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जात होते. युवा सेनेच्या कोअर टीममध्ये घोले यांचा समावेश होते. युवासेनेत त्यांच्याकडे कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी होती.
मागील अनेक दिवसांपासून अमेय घोले होते नाराज :
मागील अनेक दिवसांपासून घोले आदित्य ठाकरे आणि शिवसेना (UBT) पक्षावर नाराज होते. ते युवासेनेच्या व्हाट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट झाले होते. तसंच युवासेना कोअर कमिटीच्या बैठकांनाही त्यांनी अनुपस्थिती दर्शविली होती. त्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रम राबवले. अनेक बॅनर्स लावले होते. मात्र यातून शिवसेना, युवासेनेला वगळण्यात आले होते. आदित्य ठाकरेंचे फोटोदेखील त्या बॅनरवर लावण्याचे घोले यांनी टाळले होते. त्यामुळे युवासेना सोडल्याची जोरदार चर्चा रंगली होती.
मात्र यावर घोले यांनी पत्रकार परिषद घेवून सविस्तर भूमिका मांडली होती. युवासेनेत मोनोरेल तयार झाली आहे. आमचा फिडबॅक आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. स्थानिक स्तरावरील नियुक्त्या मेरीटवर झालेल्या नाहीत. आदित्य ठाकरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. माझ्या वॅार्डमध्ये सर्वाधिक शपथपत्र देण्यात आली. पद ही ॲान मेरिटच दिली जातात. परंतु, कोअर कमिटीच्या सदस्यांना विचारले जात नव्हते. त्यामुळे मी नाराज होतो. पण आता माझी भूमिका आदित्य ठाकरेपर्यंत पोहचल्याच सांगतं आपण शिवसेना (UBT) मध्येच असल्याचं ते म्हणाले होते. तसंच वॉट्सअॅप ग्रुपमध्ये लॅाजिकल चर्चा होत नाही. त्यामुळे तो सोडला होता , असं त्यांनी सांगितलं होतं.
आप्पासाहेबांच्या बंगल्याबाहेरची रांगोळी पुसली, रोषणाई उतरवली.. रेवदंड्यात काय स्थिती?
मुख्यमंत्र्यांनी दिली होती गणपती मंडळाला भेट :
मनोहर जोशी, गजानन किर्तीकर, लिलाधर डाके अशा शिवसेनेच्या नेत्यांची आणि इतर जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या घरी गणपती दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोले यांच्या गणपती मंडळाला भेट दिली होती. तेव्हाही घोले शिंदेंच्या गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण मुख्यमंत्री आले त्यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष उपस्थित नसल्याने आपण मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले, असे स्पष्टीकरण घोले यांनी दिले होते. तसेच स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याचा निर्वाळाही त्यांनी केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT