शिवसेनेवर (UBT) टीका, शरद पवारांनी घेतला अजित पवारांचा समाचार

मुंबई तक

ADVERTISEMENT

NCP sharad pawar hits out at ajit pawar after taking oath as deputy chief minister
NCP sharad pawar hits out at ajit pawar after taking oath as deputy chief minister
social share
google news

Sharad Pawar Attacks on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले आहेत. भाजपसोबत घरोबा केल्यानंतर अजित पवारांनी आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजप सोबतही जाऊ शकतो, असं भूमिका हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून मांडली होती. अजित पवारांच्या याच विधानांचा शरद पवारांनी समाचार केला.

ADVERTISEMENT

शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले होते की, “यात जातीयवादी म्हणण्याचा अधिकार… जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर आम्ही भारतीय जनता पक्षासोबत देखील जाऊ शकतो. त्यामुळे तिथे कुठलीही अडचण नाही. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो, तर राज्याच्या विकासाकरिता आम्ही जाऊ शकतो.”

शरद पवारांनी अजित पवारांनी सुनावलं

साताऱ्यात बोलताना शरद पवार म्हणाले, “आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो. अडीच वर्ष आम्ही शिवसेनेसोबत काम केले. त्यावेळी आम्हाला कधी वाटलं नाही की, शिवसेनेसोबत जाऊन चूक झाली. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी आणि माध्यमांनी इंदिरा गांधींवर फार मोठा हल्ला केला होता. त्या काळात इंदिरा गांधींची भूमिका योग्य आहे, असं म्हणणारा एकच नेता होता, त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचं नाव शिवसेना.”

हे वाचलं का?

वाचा >> “अजित पवारांचं बंड शरद पवारांना कळलं होतं एक दिवस आधीच”, बंडाची Inside Story

“त्याच्यानंतर जी निवडणूक झाली. त्यात शिवसेना असा एकच पक्ष होता ज्यांनी एकही उमेदवार उभा केला नव्हता. इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. यापूर्वी आम्ही त्यांच्यासोबत भूमिका घेतली होती. त्यामुळे वेगळं घडतंय असं सांगायचं कारण नाही. काहीतरी घडतंय हे आज कळलं, हे अडीच वर्षांच्या पूर्वी ज्यावेळी आम्ही सरकार स्थापन केलं आणि काल ज्यांनी शपथ घेतली. त्यांनी त्या सरकारमध्ये शपथ घेतली होती. त्यावेळी शिवसेनेबद्दलची चिंता कुणाला वाटली नाही. त्यामुळे आज काय म्हणतात याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही”, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना खडेबोल सुनावले.

बंड केलेल्या नेत्यांबद्दल शरद पवार काय म्हणाले?

“काही ठिकाणं मला अशी आहेत की, संघर्ष असेल, काही नवं उभं करायचं असेल, तर मी दोन शहरांची निवड करतो. त्यात एक सातारा आणि दुसरं कोल्हापूर. राष्ट्रवादीतील आमचे अनेक सहकारी ज्यांना आमच्या हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली. अपेक्षा होती की, हे संघटन त्यांनी मजबूत करावं. देशात भाजपकडून समाज, धर्म आणि जातींमध्ये वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. या सगळ्यांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समता यासाठी प्रयत्न करणं ही अपेक्षा सहकाऱ्यांकडून आहे”, असं मत शरद पवार यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

वाचा >> भाजपला का भासली ‘पवार पॉलिटिक्स’ची गरज?, चक्रव्यूहात कोण अडकलं अजितदादा की पवार?

“काही मित्रांनी वेगळी भूमिका घेतली. ज्यांनी वेगळी भूमिका घेतली, त्यांनी महाराष्ट्रात मोलाची कामगिरी केली. ते लोक ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्याबरोबर गेल्यामुळे नव्या पिढीचा कार्यकर्ता नाउमेद होऊ नये. तो जोमाने उभा राहावा म्हणून हा दौरा सुरू केला”, अशी भूमिका शरद पवार यांनी यावेळी मांडली.

ADVERTISEMENT

“आम्ही लोकांनी कष्ट केले. या सगळ्यांना तरुणांना योग्य दिशा दिली, कार्यक्रम दिला तर माझी खात्री आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला अनुकूल चित्र दिसेल. याची सुरूवात येथून झाली. काही लोकांनी फोन केले. अनेकांची भूमिका पक्षाची जी भूमिका आहे, त्याशिवाय वेगळी भूमिका घेऊ नये, अशी आहे. ते योग्य वेळी त्याचे निर्णय जाहीर करतील”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

वाचा >> NCP : अजित पवारांच्या बंडाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती एप्रिलमध्येच?

“महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पहिल्या दिवसांपासून ज्यांना नेतृत्व दिलं. विधिमंडळात जे पक्षाचं नेतृत्व करतात त्यांचं नाव जयंत पाटील आहे. जयंतराव पक्षाचे अध्यक्ष आहे. विधिमंडळ पक्षाचे नेतेही आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं मला माहिती नाही, पण तो त्यांचा अधिकार आहे”, असं पवारांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT