NCP : अजित पवारांच्या बंडाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती एप्रिलमध्येच?

मुंबई तक

ADVERTISEMENT

the NCP is broken due to ajit pawar revolt. It was not even a month since Supriya Sule became the working president of NCP that the party had to witness the biggest rebellion.
the NCP is broken due to ajit pawar revolt. It was not even a month since Supriya Sule became the working president of NCP that the party had to witness the biggest rebellion.
social share
google news

Maharashtra Political Crisis 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चर्चा नेहमीच होते. ते कधी कुणाला धक्का देतील, हे सांगता येत नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र, रविवारी पॉवर गेममध्ये अजित पवारांनी त्यांना मोठा धक्का दिला आणि पुतण्याच्या गुगलीने काका क्लीन बोल्ड झाले. 2 जुलै रोजी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. राजकारणाचे चाणक्य म्हणवणाऱ्या शरद पवारांना पुतणे अजित पवार यांनी पुन्हा एकदा झटका दिला. अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (Had Ajit Pawar written the script of rebellion months in advance?)

हे सर्व इतक्या झटपट घडले की तासाभरात अजित पवार थेट विरोधी पक्षनेतेपदावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांची ही खेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धक्का असल्याचे म्हटले जात आहे. इतर विरोधी पक्षांनाही या राजकीय भूकंपाने आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची त्यांच्या घरी बैठक बोलावली होती. मात्र, नंतर त्यांनी थेट राजभवन गाठले. यावेळी त्यांच्यासोबत 18 आमदारही उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही राजभवनात आधीच उपस्थित होते. नंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 8 आमदारांसह मंत्री म्हणून शपथ घेतली आणि शिवसेना-भाजप युतीच्या सरकारचा भाग बनले.

अजित पवारांच्या बंडाची स्क्रिप्ट 27 एप्रिललाच लिहिली गेली होती का?

आता असे प्रश्न पुढे येऊ लागले आहेत की, शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला आपल्याच पक्षात एवढे मोठे बंड होईल याची कुणकुण का लागली नाही. दुसरीकडे अजितदादांनी काका शरद पवार यांच्याकडून बंडखोरीचा प्लान आधीच तयार करून घेतला होता का? ही स्क्रिप्ट फार आधीपासूनच लिहिण्यास सुरूवात झाली होती का? कारण, शरद पवार यांनी 27 एप्रिल रोजी दिलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचं विधान केलं होतं. या विधानानेच महाराष्ट्रातील राजकारण चांगलं तापलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Ajit Pawar : भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी

इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने अजित पवारांना भाकरी म्हणत शरद पवार आता अजित पवारांना बाजूला करणार असल्याचे म्हटलं होतं. त्या काळापासून अजित पवारांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सातत्याने डोकं वर काढत होती. यावर भाजप आणि शिंदे गटही टिंगल करताना दिसत होता. दुसरीकडे बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि बंडखोर नेते प्रफुल्ल पटेल यांनीही जे काही घडले आहे, त्याबाबत आधीच चर्चा सुरू होती आणि त्याबाबत नियोजनही सुरू असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

वाचा >> NCP : प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादीच्या फुटीचं खापर फोडलं शिवसेनेवर, म्हणाले…

2 जुलै रोजी झालेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष होऊन एक महिनाही झाला नाही, तोच पक्षाला सर्वात मोठी बंडखोरी पहावी लागली आहे. आता लढा पक्ष वाचवण्यासाठी नसून, नाव आणि चिन्हावरून लढा सुरू झाला आहे. पक्षावर आपला अधिकार असल्याचा दावा दोन्ही बाजूंनी केला गेला आहे.

ADVERTISEMENT

“भाकरी फिरवावी लागेल”

27 एप्रिलला मुंबईत झालेल्या युवा मंथना कार्यक्रमात शरद पवार म्हणाले होते की, ‘मला कुणीतरी सांगितलं की, भाकरी योग्य वेळी परतावी लागते आणि ती योग्य वेळी परतवली नाही तर ती जळते. आता भाकरी फिरवण्याची योग्य वेळ आली आहे, त्यात उशीर होता कामा नये. या संदर्भात मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना यावर काम करण्याची विनंती करणार आहे.” शरद पवारांच्या या वक्तव्याने त्यांचा संदर्भ पुतण्या अजित पवार यांच्याकडे असल्याचे म्हटले गेले. त्यानंतर अचानक अशा अनेक घटना घडल्या की त्यावरून अजित पवार आता केव्हाही बंडखोरी करू शकतात, हे दिसू लागलं होतं.

ADVERTISEMENT

अजित पवार यांना 10 जूनला बसला धक्का

राष्ट्रवादीत आधीपासून धुसफुस सुरू झाली होती. अजित पवारांच्या गटाने अनेक दिवसांपूर्वीच बंडाचा संदेश दिला होता. दरम्यान, 2 मे 2023 रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. पक्षाचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर आले. खूप समजावून सांगितल्यानंतर त्यांनी 5 मे रोजी राजीनामा मागे घेतला. हा शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक मानला जात होता. राष्ट्रवादीत आता सर्व काही ठीक झाल्याचंही म्हटलं गेलं होतं.

वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांची NDA त एन्ट्री एकनाथ शिंदेंसाठी ‘बॅड न्यूज’!

दरम्यान, 10 जून रोजी राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांनी पुतणे अजित पवार यांना मोठा धक्का दिला. त्यांनी पक्षाच्या दोन कार्याध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे ही ती दोन नावे होती. दुसरीकडे अजित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले होते की, “अजित नेते विरोधी पक्षाची जबाबदारी सांभाळत आहेत.”

अजित यांनी पक्षात काम करण्याची व्यक्त केली होती इच्छा

अजित पवार यांनी 21 जून रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते. अजित म्हणाले होते की, विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्यात मला कधीच रस नव्हता, मात्र पक्षाच्या आमदारांच्या मागणीवरून ही भूमिका स्वीकारली. राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल आणि माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली जाईल, तिला मी पूर्ण न्याय देईन. विरोधी पक्षनेता म्हणून मी आक्रमक वागत नाही, असे मला सांगितले जाते.” दरम्यान, अजित पवारांच्या या मागणीची अनेक दिवस दखल घेतली गेली नाही.

राष्ट्रवादीच्या पोस्टरवरून अजित पवार गायब

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या संघटनात्मक बदलाचा परिणामही दिसायला लागला. अजित पवार यांना जशी संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाली नाही, त्याचप्रमाणे त्यांना पोस्टरमध्येही स्थान मिळाले नाही. निमित्त होते 28 जून रोजी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे. पोस्टरवर अजित पवार यांचा फोटो दिसत नव्हता. पोस्टरवर शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची छायाचित्रे होती. त्याचवेळी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत अजित पवारांच्या अनुपस्थितीवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या सर्व घडामोडींमध्ये अजित पवार हे काका शरद पवार यांना केव्हाही धक्का देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाली होती आणि 2 जुलै रोजी तेच घडले.

5 वेळा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होण्याची इच्छा

अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी आतापर्यंत 5 वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वीही त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड केलेले आहे. इतकंच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. त्यांनी या वर्षी एप्रिलमध्ये मुख्यमंत्री होण्याची इच्छा दर्शवली होती आणि ते म्हणाले होते की, “2024 मध्ये नाही तर ते आताच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे. ते असंही म्हणाले होते की, “2004 मध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या. तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याची संधी पक्षाने गमावली होती. मात्र, मुख्यमंत्रीपदावरील त्यांचा दावा कायम आहे.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT