NCP : प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादीच्या फुटीचं खापर फोडलं शिवसेनेवर, म्हणाले... - Mumbai Tak - praful patel tell the reason of ncp split ajit pawar dcm bjp shinde government maharashtra politics - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

NCP : प्रफुल पटेलांनी राष्ट्रवादीच्या फुटीचं खापर फोडलं शिवसेनेवर, म्हणाले…

अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी फुटली होती. मात्र या फुटीचे कारण समोर आले नव्हते. आता राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या फुटीमागचं कारण सांगितले आहे.
praful patel tell the reason of ncp split ajit pawar dcm bjp shinde government maharashtra politics

Maharashtra Latest Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उप मुख्यमंत्री तर इतर 9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी फुटली होती. मात्र या फुटीचे कारण समोर आले नव्हते. आता राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी या फुटीमागचं कारण सांगितले आहे. (praful patel tell the reason of ncp split ajit pawar dcm bjp shinde government maharashtra politics)

मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांची मुलाखत घेतली होती.या मुलाखतीत प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी फुटीचे कारण सांगितले आहे. महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे गेल्याने सगळच संपले ना. राज्यात शिवसेना ज्यावेळेस फुटली तेव्हा आम्ही सर्व एकत्र होतो. पण शिवसेना स्वत:च्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून भासवत होती, अशी टीका प्रफुल पटेल यांनी यावेळी शिवसेनेवर केली.

महाराष्ट्रात जी महाविकास आघाडीची युती होणार होती, या युतीत राष्ट्रवादीलाच खास करून तडजोड करावी लागली होती. कारण आम्हाला माहिती होते, शिवसेनेची एक वेगळी भूमिका असेल, कॉंग्रेसची वेगळी भूमिका असेल, त्यामुळे तडजोड फक्त राष्ट्रवादीलाच करावा लागणार आहे अशी खंत देखील प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली होती. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्येही तडजोड करावी लागणार आहे आणि महाविकास आघाडीतही करत होतो, असे देखील प्रफुल पटेल यांनी सांगितले.

प्रफुल पटेल पुढे म्हणतात, कितीही म्हटलं तरी भाजप हा राज्यातली सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपकडे उप मुख्यमंत्री पद असले तरी त्यांना 115 आमदारांचे समर्थन असून महाराष्ट्रात तो भक्कमपणे उभा आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे असले तरी आम्ही अजित पवारांच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडले गेलो आहोत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एक स्थिरता आहे, असे देखील पटेल म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात राष्ट्रवादीने निवडणूक लढवून ती जिंकावी आणि सरकार बनवावे तशी परीस्थिती बनत नाही आहे. त्यामुळे आम्ही परिस्थितीनुसार निर्णय़ घेत असतो. आज आम्ही जो निर्णय घेतलाय तो महाराष्ट्राच्य़ा हितासाठी, विकासासाठी घेतला असल्याचे कारण प्रफुल पटेल यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवसेना-भाजपात काय फरक आहे, तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही यांच्यासोबतही आहोत, तर त्यांच्यासोबतही आहोतच, असे देखील प्रफुल पटेल यांनी सांगितले.

मी शरद पवार यांच्या कोणत्याही गोष्टीवर टीका करणार नाही, ते माझे मार्गदर्शक आहेत, काल होते, आज होते आणि पर्वाही असतील, असे देखील प्रफुल पटेल यांनी सांगितले.

‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट!