Arjun Khotkar : 'मुडदे पाडण्याच्या' विधानावर खोतकरांचा पलटवार, ''रावसाहेब दानवे काहीही...''

मुंबई तक

Arjun khotkar vs Raosaheb Danve: रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मुडदे पाडलेत, असा इशारा भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांना दिला होता. दावनेंच्या या विधानावर आता खोतकरांनी पलटवार केला आहे. ''रावसाहेब दानवे मोठे माणसं आहेत, ते काहीही करू शकतात असं म्हणत दानवेंवर खोतकरांनी जोरदार पलटवार केला.

ADVERTISEMENT

दावनेंच्या या विधानावर आता खोतकरांनी पलटवार केला आहे.
arjun khotkar reply raosaheb danve criticize jalana vidhan sabha costituency maharashtra politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रावसाहेब दानवे यांनी माझं नावचं घेतलं नाही

point

मी मनाला कशाला लावून घेऊ

point

दानवे कोणाला बोलले याचा उलगडा करावा

Arjun khotkar vs Raosaheb Danve: गौरव साळी, जालना : रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मुडदे पाडलेत, असा इशारा भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांना दिला होता. दावनेंच्या या विधानावर आता खोतकरांनी पलटवार केला आहे. ''रावसाहेब दानवे मोठे माणसं आहेत, ते काहीही करू शकतात असं म्हणत दानवेंवर खोतकरांनी जोरदार पलटवार केला. (arjun khotkar reply raosaheb danve criticize jalana vidhan sabha costituency maharashtra politics) 

अर्जुन खोतकर हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेवर पत्रकारांनी खोतकरांना प्रतिक्रिया विचारली होती. यावर अर्जुन खोतकर म्हणाले, रावसाहेब दानवे यांनी माझं नावचं घेतलं नसेल तर मी मनाला कशाला लावून घेऊ.  तसचे बोलण्याच स्वतंत्र सर्वांना आहे, दानवे कोणाला बोलले याचा उलगडा त्यांच्याकडून करावा असे देखील खोतकर म्हणाले आहेत. रावसाहेब दानवे मोठे माणसं आहेत, ते काहीही करू शकतात असं म्हणत खोतकर यांनी दानवे यांच्यावर हल्ला चढवलाय. 

हे ही वाचा : Gunaratna Sadavarte : पहिल्याच दिवशी Bigg Boss च्या घरात सदावर्ते डाराडूर झोपले, कोंबडा आरवला तरी...Video व्हायरल!

जागावाटपावर देखील अर्जुन खोतकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. भाजपाला आगोदरच 3 जागा जिल्ह्यात आहेत, आता ते परत 2 जागा मागताय; मित्र पक्षांनी काय करायचं असा सवाल खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांनी केलेल्या जागेच्या दाव्यावर केला आहे. अवाजवी मागण्या करून काही होत नसतं, निर्णय घेणारे लोकं वेगळे आहेत, ते निर्णय घेतील असं खोतकर यांनी म्हटलं आहे. 

तसेच रावसाहेब दानवे यांनीच म्हटलंय माझा पराभव जनतेनं केलाय, आता ते कोणाला बोलताय त्यांनी त्याचा उलगडा करावा असं आव्हान खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांना दिलं आहे. प्रत्येकाला जागा मागण्यांचा अधिकार आहे, निर्णय घेणारे वेगळे आहेत, आणि जागा मागणारे वेगळे आहेत. युती ठेवायची की नाही ठेवायची याचा निर्णय वरच्या पातळीवर नेते घेतील असं मोठं विधान देखील खोतकर यांनी केले आहे.

हे ही वाचा : Eknath Shinde: 'अरे बापाशी भिडा ना, लहान मुलाशी काय...', CM शिंदेंचं ठाकरेंना ओपन चॅलेंज

दानवेंचं विधान काय? 

जिंकल्याचं क्रेडिट घ्यायची पद्धत आहे. पण काही महाभाग म्हणताय रावसाहेब दानवे माझ्यामुळे हारले, त्यांचा सत्कार केला पाहिजे, असा सणसणीत टोला भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना लगावला आहे. तसेच रावसाहेब दानवे कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मुडदे पाडलेत, असा इशारा देखील त्यांनी खोतकरांना दिला आहे.

भाजपा आणि मित्र पक्ष या राज्यात एकत्र लढून पुन्हा सत्ता आणू असं म्हणत ही निवडणूक भाजपने विकासाच्या मुद्द्यावर लढवण्याचे ठरवले असल्याचं दानवे म्हणालेत.  जालना आणि घनसावंगी या दोन जागा भाजपाला सोडण्यासाठी मी पक्ष श्रेष्ठीकडे प्रयत्न करणार असं देखील दानवे म्हणालेत. फक्त भोकरदन, बदनापूर आणि परतूर नाही, तर जालना आणि घनसावंगी मध्ये सुद्धा भाजपाची ताकद असल्याचं दानवे यांनी सांगितले आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp