‘भाजप सापाप्रमाणे डूख धरून दंश करणारा पक्ष..’, शिवसेनेची (UBT) विखारी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp is a party that bites like a snake shivsena ubt scathing criticism
bjp is a party that bites like a snake shivsena ubt scathing criticism
social share
google news

मुंबई: ‘भारतीय जनता पक्ष (BJP) निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. भारतीय जनता पक्ष हा विषारी प्रवृत्तीचा, सूडाने वागणारा, सापाप्रमाणे डूख धरून दंश करणारा, जात-धर्माचे विष फैलावून समाजास त्याच विषात बेहोश करणारा पक्ष आहे.’ अशी विखारी टीका शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. (bjp is a party that bites like a snake shivsena ubt scathing criticism)

ADVERTISEMENT

कर्नाटक निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी हे विषारी सापाप्रमाणे आहेत. अशी टीका केल्याने राजकारण तापलं आहे. असं असताना शिवसेनेने देखील थेट हल्लाबोल करत भाजप हा विषारी प्रवृत्तीचा पक्ष असल्याची जहरी टीका केली. खरं तर शिवसेनेने अशी विखारी टीका करत भाजपला डिवचण्याचाच प्रयत्न केला आहे.

पाहा सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • पंतप्रधान मोदी हे विषारी सापाप्रमाणे आहेत, असे विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी केल्यामुळे कर्नाटक निवडणुकीतील प्रचारात विषाला उकळी फुटली आहे. प्रचारात काँग्रेसने बाजी मारली व भाजप मागे पडला आहे. स्वतः मोदी हे फार हिरीरीने प्रचार करताना दिसत नाहीत. यावेळी कर्नाटकातून भाजपचे राज्य जात असून काँग्रेसच सत्तेवर येईल असे एकंदरीत वातावरण आहे. भाजपकडे प्रचारासाठी मुद्दे नाहीत. अशा वेळेला श्री. खर्गे यांनी विषारी साप भाजपच्या पोतडीत पाठवला व आता पुढे काही दिवस समस्त भाजपवाले त्या सापाची पुंगी वाजवतील, त्यास दूध पाजतील.
  • कदाचित साप व नाग ही राष्ट्रीय दैवते असून काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी सापांचा अपमान केला, त्यामुळे हिंदुत्व कसे धोक्यात आले, अशा पुंग्या वाजवून अंधभक्तांचे फणे डोलायला लावतील. भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. भारतीय जनता पक्ष हा विषारी प्रवृत्तीचा, सूडाने वागणारा, सापाप्रमाणे डूख धरून दंश करणारा, जात-धर्माचे विष फैलावून समाजास त्याच विषात बेहोश करणारा पक्ष आहे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.
  • पंतप्रधान पदावरील व्यक्तीस साप वगैरे उपमा देणे बरे नाही, पण विधानसभांच्या प्रचारात पंतप्रधान पदावरील व्यक्तीने उतरणे कितपत योग्य आहे? याचा विचार भाजपप्रणीत निवडणूक आयोगाने करायला हवा. खरे तर प्रचारात विषारी फूत्कार सोडण्याचे काम पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा करीत आहेत. कर्नाटकात काँग्रेस जिंकली तर दंगे होतील, असे विधान गृहमंत्री शहा यांनी करावे हे विषारी फूत्कारच आहेत व असे फूत्कार सोडणे हे धार्मिक विष पसरवण्यासारखे आहे. प. बंगालात वगैरे ममता जिंकल्या किंवा अन्य राज्यांत भाजप पराभूत झाला तर पाकिस्तानात फटाके वाजवले जातील, असे विधानही देशाचे गृहमंत्री प्रचारादरम्यान करीत असतात. हे विष नाही तर काय?

    हे ही वाचा>> मोठी बातमी: शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे, जावयाकडे अदाणी कंपन्यांचे 45 हजार शेअर्स!

  • दिल्लीच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री एका विशिष्ट धर्माच्या लोकांना ‘गोली मारो सालों को’ असे चिथावणीच्या भाषेत सांगतो व त्या विषारी जिभांना लगाम घालावा असे आपल्या पंतप्रधानांना वाटत नसेल तर देश विषारी सापांच्या विळख्यात सापडला आहे, असे का म्हणू नये? मुळात नागराज-सापराज यांना हिंदू धर्मात श्रद्धेचे स्थान आहे. त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यात विष असूनही पूजा होते. मग ‘सापा’ची पदवी एखाद्यास दिल्याने कुणास उसळायचे कारण काय? साप म्हणजे सोवळ्यातला ब्राह्मण, असे वर्णन आचार्य विनोबांनी करून ठेवले आहे.
  • साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. महाराष्ट्रात तर सापास शेतीचा राखणदार म्हटले जाते. शेतातले उंदीर-घुशी वगैरे खाउन तो पिकाचे रक्षण करतो. त्याच्या जिभेत व दातांत विष आहे ही निसर्गाची किमया आहे. पण साप उगाच कुणाच्या वाटेला जात नाही. सापाच्या शेपटीवर पाय पडल्याशिवाय तो फणा काढीत नाही हे सत्य आहे. पण आता सापांपेक्षा माणसांच्या जिव्हांतले विष जास्त भयंकर व न उतरणारे आहे व या मानवी विषाने जे सूडाचे प्रवाह आपल्या देशात निर्माण केले आहेत ते विनाशक आहेत.
  • पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आजच्या भाजपने त्या विषाचाच महायज्ञ मांडला आहे. भाजपवाल्यांनी त्यांच्या तोंडास येईल ते बोलायचे, कुणावरही देशद्रोही असल्याचे फूत्कार सोडायचे, हे सापाच्या स्वभावाशी मिळतेजुळते आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालचे भाजपचे अमृतकुंभ ज्यांनी अनुभवले आहेत त्यांना आजच्या विषालयाची भीती नक्कीच वाटेल व वातावरण तसेच आहे.

    हे ही वाचा>> ‘बदला, सूड, खुनशी वृत्ती तुमचीच…!’ CM शिंदेंनी ठाकरेंवर थेट केला वार

  • धार्मिक तेढ निर्माण करून दुफळी माजवणे हे लक्षण विषासारखेच आहे. देशाची लूट करणाऱ्या उद्योगपतींना पाठीशी घालणे व त्यांचे समर्थन करणे हे तर जहराचे शेवटचे टोक आहे. विष शंकराने पचवले म्हणून तो निळकंठ झाला. काही लोकांना पंतप्रधान मोदी हे विष्णूचे व शंकराचे अवतार वाटतात. मग साप गळय़ात घालून विष पचवणाऱ्या शंकराशी तुलना होताच राजकीय तांडव करण्याचे कारण काय?
  • मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रचाराच्या सभेत काय सांगितले? ते म्हणतात, ‘‘मोदी हे विषारी सापासारखे आहेत. ते विषारी आहेत की नाहीत याची तुम्ही परीक्षा घेऊ नका. मोदीसारखा चांगला माणूस विष कशाला देईल असे तुम्हाला वाटेल, पण तुम्ही विष चाखण्याचा प्रयत्न केल्यास तत्काळ गतप्राण व्हाल,’’ असे श्री. खर्गे म्हणाले व भाजपच्या जिभांतील विष उसळून बाहेर पडले. सत्य असे की, याच विषामुळे आपल्या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य गतप्राण झाल्यासारखे आहे. न्यायालये, संसद, सर्व घटनात्मक संस्थांना सापांचा विळखा पडला आहे. लोकशाहीच्या नावाने, गरीबांच्या नावाने आपले पंतप्रधान रोज पुंगी वाजवतात व अंधभक्त त्यावर डोलतात.

    हे ही वाचा>> ‘ते’ विश्वासघातकी नसतात; चहावाला, रिक्षावालाही…’, CM एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं!

  • जे डोलत नाहीत त्यांना देशद्रोही ठरवून छळले जाते. असे विषारी प्रवाह देशात कधीच निर्माण झाले नव्हते. अमृतकुंभाचे जहर झाले. त्या जहरावर कुणी टीका केली असेल तर भाजपास आत्मचिंतनाची गरज आहे. महाराष्ट्राचेच बोलायचे तर उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले, ‘‘सापाच्या पिल्लाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले. ते पिल्लू तेव्हा वळवळ करत होते. आता आमच्यावरच फूत्कारत आहे.’’ सापाशी तुलना करणे हे नित्याचेच आहे. साप हा आपल्या जीवनाचा व संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे भाजपास असा फूत्कार सोडण्याचे कारण नाही.

चाणक्याने सांगितले आहे,

हे वाचलं का?

‘‘दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः
सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे ।।

  • म्हणजेच दुष्ट माणूस व साप यात फरक आहे. साप तुम्हाला तेव्हाच चावतो जेव्हा त्याचा जीव धोक्यात असतो, पण दुष्ट माणूस पावलोपावली तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूरच राहावे. या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. खर्गे यांना तेच म्हणायचे असावे. भाजपास सापाचे वावडे का? सापास झिडकारून ते हिंदुत्वाचाच अपमान करीत आहेत. गोमूत्रधारी हिंदुत्ववाद्यांनी खर्गे यांना उत्तर म्हणून गळ्यात साप लटकवून प्रचारात ‘धूम’ माजवायला हवी, पण ‘साप साप’ म्हणून श्री. खर्गे यांना धोपटण्याचेच प्रकार चालू आहेत!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT