”ते’ विश्वासघातकी नसतात; चहावाला, रिक्षावालाही…’, CM एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

CM Eknath Shinde Replied to Uddhav Thackeray on branded shoe polishing criticized
CM Eknath Shinde Replied to Uddhav Thackeray on branded shoe polishing criticized
social share
google news

मुंबई : तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. असं म्हणतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करुन माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. (CM Eknath Shinde Replied to Uddhav Thackeray on branded shoe polishing criticized)

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात.

हे ही वाचा : ‘जयंत पाटलांसारखा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री हवा…’, अमोल कोल्हे असं का म्हणाले?

जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे….

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे यांनी आज कामगार सेनेच्या कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले होते, इतर मोठे प्रकल्प शेजारच्या राज्यात जात आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. एक ट्विट बघितले मी की, ब्रँडेड शू बनवणारी एक कंपनी महाराष्ट्रात येणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ‘स्वयंभूंच्या मागेच जनता, शेंदूर फासलेल्या…’ राऊतांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

त्यामुळे 2 हजार 300 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असं सांगितलं होतं, फोटो काढले होते. पण आज कळलं की ती जो़डे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूला गेली. हे बसलेत जोडे पुसत आणि जोडे बनवतात तिकडे. तुम्ही नुसते जोडेच पुसत बसा. म्हणजे जोडे पुसायची लायकी असणारी लोकं राज्य करत आहेत, महाराष्ट्राचं पुढे काय होणार? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT