'बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर बुरख्याला बंदी घाला', नितेश राणेंची शालेय मंत्र्यांकडे मागणी

मुंबई तक

बोर्ड परीक्षा केंद्रांवर बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी करणारे पत्र भाजपचे मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना लिहलं आहे.

ADVERTISEMENT

'बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर बुरख्याला बंदी घाला'
'बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर बुरख्याला बंदी घाला'
Google CTA

मुंबई: भाजपचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी थेट महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून एक अशी मागणी केली आहे की, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नितेश राणेंनी पत्रात म्हटले आहे की, मुलींना परीक्षा हॉलमध्ये बुरखा घालण्याची परवानगी दिल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

नितेश राणे यांनी राज्य मंडळाच्या (बोर्ड) दहावी आणि बारावीच्या परीक्षेत बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी बुधवारी राज्य मंडळाच्या पुढील महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये बुरखा घालण्यावर बंदी घालण्याची मागणी केली.

हे ही वाचा>> परीक्षा सुरू असतानाच मुलीला आली मासिक पाळी, सॅनिटरी पॅड मागताच प्रिन्सिपलने...

नितेश राणेंनी पत्रात नेमकी काय मागणी केली?

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, 'परीक्षा हॉलमध्ये मुलींना बुरखा घालण्याची परवानगी दिल्याने गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होऊ शकतात. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या मुलींना बुरखा घालण्याची परवानगी देऊ नये. आवश्यक असल्यास, तपासणीसाठी महिला पोलीस अधिकारी किंवा महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या परीक्षा खूप महत्त्वाच्या आहेत. नागरिकांच्या कल्याणासाठी आणि ते पारदर्शक पद्धतीने, फसवणुकीसारख्या कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांपासून मुक्त असले पाहिजे.'

नितेश राणे पुढे म्हणाले, 'जर परीक्षार्थींना बुरखा घालण्याची परवानगी दिली तर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स किंवा इतर माध्यमांचा वापर करून फसवणूक केली जात आहे की नाही हे ठरवणे कठीण होईल. कोणतीही अनुचित घटना घडल्यास, सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो."