Siddhivinayak Temple : 'त्या' गणेशभक्तांना सिद्धीविनायक मंदिरात प्रवेश मिळणार नाही! ट्रस्टने घेतला सर्वात महत्त्वाचा निर्णय

Siddhivinayak Temple Latest News: गणेशभक्तांचं आराध्यदैवत असणाऱ्या सिद्धीविनायक मंदिराबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचं सुप्रसिद्ध मंदिर सिद्धीविनायक ट्रस्टने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

Siddhivinayak Temple latest News
Siddhivinayak Temple latest News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सिद्धीविनायक मंदिराबाबत ट्रस्टने घेतला महत्त्वाचा निर्णय

point

कोणत्या भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही?

point

सिद्धीविनायक मंदिर प्रशासनाने केलं परिपत्रक जारी

Siddhivinayak Temple Latest News: गणेशभक्तांचं आराध्यदैवत असणाऱ्या सिद्धीविनायक मंदिराबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचं सुप्रसिद्ध मंदिर सिद्धीविनायक ट्रस्टने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तोकडे कपडे घालून पुरुष किंवा महिलांना सिद्धीविनायक मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याबाबत मंदिर प्रशासनाकडून अधिकृत परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. 1 फेब्रुवारीपासून ड्रेस कोडबाबतचा हा निर्णय लागू केला जाणार आहे. शॉर्ट कपडे घालून सिद्धीविनायक मंदिरात प्रेवश करणाऱ्यांबाबत लोकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. याच तक्रारींची दखल घेत आणि मंदिराचं पावित्र्य आणि भारतीय वेशभुषा परंपरा जपण्यासाठी ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिद्धीविनायक मंदिराची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी तोकडे कपडे घालणाऱ्यांना मंदिर परासरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसच प्रसादाबाबतही बदल करण्यात आला आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कागदाच्या पॅकेटमध्ये सिद्धीविनायक मंदिरात प्रसाद दिला जाणार आहे. याआधी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात होता. 

हे ही वाचा >> Dhananjay Munde : "...तर मी राजीनामा देणार", संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचं सर्वात मोठं विधान!

दरम्यान, माघी गणेशोत्सवानिमित्त मंदिर प्रशासनाची जोरदात तयारी सुरु आहे. अशातच मंदिर प्रशासनाने ड्रेस कोडचा निर्णय लागू केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धीविनायक मंदिरात भव्य पालखी सोहळा आयोजित केला जातो. मुंबईच्या अनेक भागात गणरायाची पालखी फिरवली जाते. 1 फेब्रुवारीला माघी गणेशोत्सव आहे. याच पार्श्वभूमीवर लाखो भाविक सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

हे ही वाचा >> Mahakumbh Stampede : कुणाची आई गेली, कुणाची पत्नी... गंगेच्या तिरावर नातेवाईकांचा आक्रोष

फेब्रुवारी महिन्यात माघी गणेशोत्सवाची धामधून सुरु होणार आहे. मुंबईचं सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातही लाखो भाविक गणरायचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. परंतु, यंदाच्या उत्सवासाठी मंदिर प्रशासनाने एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत गणेशभक्तांच्या ड्रेसकोडबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्या पुरष किंवा महिला तोकडे कपडे घालून मंदिरात येण्याचा प्रयत्न करतील, त्यांना प्रेवश दिला जाणार नाही. ज्या लोकांनी भारतीय वेशभुषा असलेला ड्रेस कोड परिधान केलेला असेल, त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे.