अखेर कंडका पडला! ‘राजाराम कारखान्यात’ वाजली महाडिकांची शिट्टी; पाटील गटाचा धुव्वा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chhatrapati Rajaram Maharaj Sugar factory elections, the ruling Mahadik group has won a big victory.
Chhatrapati Rajaram Maharaj Sugar factory elections, the ruling Mahadik group has won a big victory.
social share
google news

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याच लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती राजाराम महाराज कारखाना निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने मोठा विजय मिळविला आहे. 21-0 अशा फरकाने एकहाती वर्चस्व मिळवत महाडिक गटाने विरोधी सतेज पाटील (Satej Patil) गटाचा धुव्वा उडवला. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या राजर्षि छत्रपती शाहू सहकार आघाडी पॅनेल विरुद्ध माजी मंत्री सतेज पाटील यांनी परिवर्तन आघाडी पॅनेल उभं करुन ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची केली होती. (Chhatrapati Rajaram Maharaj Sugar factory elections, the ruling Mahadik group has won a big victory.)

ADVERTISEMENT

दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच महाडिक गटाने विजयी आघाडी मिळविण्यास सुरुवात केली होती. पहिल्या फेरीत महाडिक गटाचे सर्व उमेदवार जवळपास 800 ते 900 मतांनी होते आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीतही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. एवढचं नाही तर सतेज पाटील यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कसबा-बावड्यातही महाडिक गटाच्या उमेदवारांनी लक्षणीय मत घेतली. बावड्यात एकूण 916 पैकी तब्बल 310 हून अधिक मत महाडीकांनी घेतली. त्याचवेळी महाडिक यांचा बालेकिल्ला असलेल्या शिरोलीमध्ये पाटील यांना 800 पैकी केवळ 130 मतं मिळवता आली.

हे ही वाचा : CM एकनाथ शिंदे सुट्टीवर! मुंबई अन् ठाणे सोडून थेट सातारा गाठलं; कारण रात्री 2 वाजता…

छत्रपती राजाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले या तालुक्यांतल्या केवळ 122 गावांत विस्तारलेलं आहे. या तालुक्यांमधील सगळे नेते महाडिक गटाच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळालं. या विजयानंतर बोलताना महादेवराव महाडिक म्हणाले, या विजयाचे संपूर्ण श्रेय हे सुज्ञ सभासदांना देतो. महाडिकांची ताकद काय हे सभासदांनी दाखवून दिलं. आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावरकर हे प्रामाणिकपणे आमच्यासोबत राहिले, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांनी गाजवली निवडणूक :

दरम्यान, या निवडणुकीच्या सुरुवातीलाच सतेज पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र ठरले होते. त्यामुळे पाटील गट चांगलाच आक्रमक झाला होता. विभागीय सहसंचालक साखर कार्यालयात पाटील गटाच्या वतीने सव्वा लाख कागदपत्र देत उमेदवार पात्र असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हा दावा सहसंचालकांनी फेटाळून लावला. यानंतर पाटील गटाकडून उच्च न्यायालयातही धाव घेण्यात आली होती. मात्र तिथेही त्यांची निराशा झाली.

हे ही वाचा : Barsu Refinery : हजारो महिलांचं रस्त्यावर झोपून आंदोलन, रिफायनरीचा वाद काय?

कंडका पाडायचाच!

या निवडणुकीच्या प्रचारसभेत पाटील गटाने अत्यंत आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली होती. यंदा कंडका पाडायचाच… अशी आरोळी देत पाटील गटाने महाडिक गटाविरोधात प्रचार सुरु केला होता. प्रचारात एकमेकांना आव्हान देण्यासोबतच एकेरी उल्लेख करण्याची भाषा सुद्धा दोन्ही बाजूंनी दिसून आली. त्याचबरोबर हा वाद कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकापर्यंत येऊन पोहोचला होता. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय होते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. आता अखेर कंडका पडला असून महाडिक गटाने मोठा विजय मिळवला आहे.

ADVERTISEMENT

सतेज पाटलांचे महाडिकांवर आरोप :

या निकालानंतर बोलताना सभासदांचा कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली. ते म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी येल्लूर गावासह वाढविलेल्या सभासदांचा फटका आमच्या आघाडीला बसला. पण आता सत्ता हस्तगत केलेल्या महाडिक गटाने 12 हजार सभासदांना न्याय द्यावा. या निवडणुकीत खोटी ओळखपत्र दाखवून मतदान करण्यात आलं, परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज छाननीत जाणीवपूर्वक बाद केले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT