”वड्डेटीवार एवढा मोठा…”, नाना पटोलेंनी काय सुनावलं?
Nana Patole Criticize Vijay Wadettiwar :विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) एवढा मोठा नाही की त्याच्यासाठी मी इथ बोललं पाहिजे अशी टीका नाना पटोले यांनी वड्डेटीवार यांच्यावर केली आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही टीका केली होती.
ADVERTISEMENT
Nana Patole Criticize Vijay Wadettiwar : सातारा : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आता स्वपक्षीय नेत्यावरच टीका करून कॉग्रेसला घरचा आहेर दिला आहे. विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) एवढा मोठा नाही की त्याच्यासाठी मी इथ बोललं पाहिजे अशी टीका नाना पटोले यांनी वड्डेटीवार यांच्यावर केली आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही टीका केली होती. (congress nana patole criticize vijay wadettiwar is not so big that i should speak for him here)
ADVERTISEMENT
डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 64 व्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे साताऱ्यातील डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यास गेले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोलेंमुळे महाविकास आघाडीत फुट पडू शकते असे विजय वड्डेटीवार (Vijay Wadettiwar) म्हणाल्याचा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. यावर नाना पटोले यांनी,आता वडेट्टीवार एवढा मोठा नाही की त्याच्यासाठी मी इथ बोललं पाहिजे,अशी टीका केली. यासोबत वडेट्टीवारांचा आम्ही एका बंद खोलीमध्ये निर्णय करू, असा इशारा देखील त्यांनी यावेळी देऊन टाकला.
हे ही वाचा : Thackeray vs Shinde : ‘सुप्रीम’ निकाल कुणाच्या बाजूने? या आहेत 4 शक्यता
पृथ्वीराज चव्हाणांना पक्षात १ नंबरचं स्थान
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांच्यावर शरद पवार यांनी टीका केली होती. या टीकेवर बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, “पृथ्वीराज चव्हाण यांचं पक्षात १ नंबरचं स्थान आहे. शेवटपर्यंत १ नंबरच असेल. पृथ्वीराज चव्हाण हे आमचे नेते होते आणि राहतील. भाजपाच्या तानाशाहीविरुद्ध लढण्याची क्षमता पृथ्वीराज चव्हाणांमध्ये आहे. याचा आम्हाला स्वाभिमान आहे,”
हे वाचलं का?
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवारांना (Sharad Pawar) साताऱ्यात पृथ्वीराज चव्हाणांविरोधात (Prithviraj chavan) विचारणा केली होती. यावेळी शरद पवार म्हणाले, त्यांनी त्यांच्या पक्षात काय स्थान आहे.ते ए आहेत, की बी आहेत की सी आहेत की डी आहे ते आधी तपासावं.त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की त्यांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला सांगतील, जाहीर नाही सांगणार,असे ते म्हणाले.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचा उल्लेख, PM नरेंद्र मोदींवर घणाघात; शरद पवार काय बोलले?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT