‘ओबीसींना नामांतराचे चॉकलेट…’, कॉग्रेसच्या जेष्ठ नेत्याची भाजपवर टीका
Senior Congress leader criticizes BJP : आरक्षणाचा मुद्दा बाजूला करून ओबीसींना नामांतराचे चॉकलेट दिल्याची टीका आता कॉग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई (husain dalwai) यांनी केली आहे. यासोबतच अहमदनगचे नामांतर मालोजी राजे करा अशी मागणी देखील दलवाई यांनी केली. अहमदनगरमध्ये ते बोलत होते.
ADVERTISEMENT
Senior Congress leader criticizes BJP : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी होळकरनगर (Ahilya Devi Nagar) करणार असल्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरक्षणाचा मुद्दा बाजूला करून ओबीसींना नामांतराचे चॉकलेट दिल्याची टीका आता कॉग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई (husain dalwai) यांनी केली आहे. यासोबतच अहमदनगचे नामांतर मालोजी राजे करा अशी मागणी देखील दलवाई यांनी केली. अहमदनगरमध्ये ते बोलत होते. (congress senior leader husain dalwai criticize shide fadnavis government)
ADVERTISEMENT
नामांतरावर काय म्हणाले?
अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर केले याचा आम्ही विरोध करत नाही. अहिल्यादेवीचा आदर आम्ही करतो, पण त्यांचे कार्य हे इंदोर येथे होते त्यामुळे त्याचे नाव अहिल्यादेवी करावे असे हुसैन दलवाई म्हणाले आहेत.यासोबतच अहमदनगचे नामांतर मालोजी राजे करा अशी मागणी देखील हुसेन दलवाई (husain dalwai) यांनी केले आहे.
हे ही वाचा : Maharashtra politics : भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, रणनीती ठरली!
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याऐवजी धनगर समाज्याचा सर्वे करा असा सल्ला हुसेन दलवाई यांनी दिला आहे. यासोबत एखाद्या समाजाला जवळ करण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा बाजुला करून ओबीसींना नामांतराचे चॉकलेट दिल्याची टीका हुसेन दलवाई यांनी भाजपावर केली आहे. नामांतराने समाजाचे मुळीच समाधान होणार नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचे, नोकरीचे, घराचे प्रश्न सोडवा तरच ते तुमच्या सोबत राहतील, असे देखील दलवाई म्हणाले आहेत. आरक्षणाचा मुद्दा वळवून हिंदु मुस्लिम करून समाजात दुफळी निर्माण करायची आणि विशिष्ट लोकांना सर्व काही द्यायचे, अशी टीका देखील दलवाई यांनी केली आहे.
हे वाचलं का?
अहमदनगरच्या जामखेडच्या चौडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी होळकरनगर करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता औरंगाबादच छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव केल्यानंतर आता अहमदनगरचे नामांतर होणार आहे.उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझीही तीच इच्छा आहे. आणि तुमच्या सर्वांच्या इच्छेखातर अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी होळकरनगर करण्याचा निर्णय़ राज्य सरकारने घेतला आहे.
हे ही वाचा : Maharashtra Politics: ‘धरणामध्ये मु@x$ पेक्षा थुंकणं..’, संजय राऊतांची अजित पवारांवर टीका
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT