Maharashtra politics : भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, रणनीती ठरली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra assembly election 2024 bjp reworks vasantrao bhagwat madhav formula
maharashtra assembly election 2024 bjp reworks vasantrao bhagwat madhav formula
social share
google news

Maharashtra Politics Latest News : महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूका होणार आहेत.या निवडणूकीच्या अणुषंगाने सर्वच पक्षाने तयारी सूरू केली आहे. भाजपने सुद्धा महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) पराभव करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. या रणनीतीनुसार भाजप निवडणूकीत 80 च्या दशकातला माधव फॉर्म्युला वापरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माधव (Madhav)फॉर्म्युला म्हणजे मा – माळी, ध -धनगर आणि व-वंजारी (बंजारा). ओबीसी समुदायातील हे वर्ग आहेत. या वर्गाला खुश करण्यासाठीच अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आले होते. त्यामुळे अहमदनगरचे नामांतर या रणनीतीचा एक भाग होता. आता ही रणनीती महाराष्ट्रात भाजपसाठी कसे काम करते हे जाणून घेऊयात. (maharashtra assembly election 2024 bjp reworks vasantrao bhagwat madhav formula)

अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) या साहस, परोपकार आणि धार्मिक कार्याच्या प्रतीक आहेत. धनगर समाज त्यांची देवाप्रमाणे पूजा करतो. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अकोला, परभणी, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात धनगर समाजाचे प्राबल्य आहे. जवळपास 100 विधानसभा मतदारसंघात धनगर समाज आहे. दुसरीकडे, तज्ञांच्या म्हणण्यानुसार, 40 हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये या समाजाच्या लोकांचा निर्णायक मते आहेत.

हे ही वाचा : Maharashtra Politics : भाकरी फिरवली! भगीरथ भालके सोडणार शरद पवारांची साथ?

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी 2014 साली धनगर, माळी आणि वंजारा नेत्यांच्या युतीसाठी अथक प्रयत्न केले होते. या त्यांच्या प्रयत्नांचा भाजपला निवडणुकीत चांगला फायदा झाला होता. 2014 च्या जाहीरनाम्यात भाजपाने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजपाने या आश्वासनाची पुर्ती केली नाही. त्याऐवजी धनगर नेते आणि मुंडे कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2014 साली भाजपची सत्ता येताच भाजप नेतृत्वाने राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी डझनभर मराठा नेत्यांना सामील करून घेतले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर मराठा नेत्यांना पक्षात अधिक महत्त्व आल्याचे ओबीसी नेत्यांचे म्हणण होतं. याआधी दीर्घकाळ मराठा नेतृत्वावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्यामुळे भाजपमधील ओबीसी नेतृत्वालाही उपेक्षित वाटले. 80 च्या दशकात वसंतराव भागवतांनंतर कोणताही नेता मुख्य प्रवाहाच्या राजकारणात दिसला नाही.

वसंतराव भागवत यांचे माधव सूत्र

1980 ला भाजपची स्थापना झाली.त्यावेळी हा पक्ष ब्राम्हणांचा आणि उच्चवर्णीयांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. 1980 च्या दशकात मराठा समाजाला धरून कॉग्रेस पक्ष सत्तेत होता, त्यामुळे मराठा समाजाला धरून जास्त फायदा होणार नाही हे त्यांना कळून चुकलं होत. त्यामुळे पक्षाने आपला मोर्चा बहूजन समाजाकडे वळवला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वसंतराव भागवत यांनी भाजप हा उच्चवर्गीय नेतृत्व म्हणून ओळखला जात असला तरी पक्षाची प्रतिमा बदलण्यासाठी आणि मतांचे राजकारण व्यवहार्य करण्यासाठी राज्यात माधव पॅटर्न आणला. महाराष्ट्रातील बहूजन समाजातील नेत्यांना एकत्र करून त्यांनी कामाला सुरूवात केली होती. वसंतराव भागवत यांनी स्व.गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, महादेव शिवणकर आणि इतर (माळी, धनगर, वंजारी) यांच्या मदतीने राज्य़ात माधव सूत्र यशस्वीरित्या वापरले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : “मोदी, शाहांच्या हिमतीचे बुडबुडे फुटतील”, संजय राऊतांनी चढवला हल्ला

कर्नाटकमधील पराभवानंतर भाजप महाराष्ट्रात ओबीसींना आकर्षित करण्यासाठी 80च्या दशकातला माधव फॉर्म्युला वापरत आहे. या फॉर्म्युलाच एक भाग म्हणून भाजपने मराठवाड्यातील मुंडे भगिनींसोबतच भागवत कराड यांनाही केंद्रात मंत्रीपदावर बढती देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात ओबीसी नेते अतुल सावे हे बहुजन कल्याण आणि सहकार मंत्रालय पाहत आहेत. महाराष्ट्रात भाजपचं प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे. त्यानंतर आता अहमदनगरचे अहिल्यादेवी होळकर नामांतर करण्याचा निर्यण घेतला. या नामांतराचा आता त्यांना किती फायदा होतो? हे आगामी निवडणूकीतच कळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT