सोलो ट्रेकवर निघालेला टेक प्रोफेशनल बेपत्ता, ड्रोनमध्ये मृतदेहासारखी वस्तू दिसली, पण..

मुंबई तक

Crime News : सोलो ट्रेकसाठी गेलेले 31 वर्षीय टेक प्रोफेशनल अद्वैत उपाध्याय बेपत्ता झाले आहेत. शोधमोहीमेदरम्यान ड्रोनला मानवी शरीरासारखी वस्तू दिसली असून, अद्याप त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोलो ट्रेकवर निघालेला टेक प्रोफेशनल बेपत्ता

point

ड्रोनमध्ये मृतदेहासारखी वस्तू दिसली!

Crime News : बंगळुरुच्या ग्रामीण भागातील शिवगंगे हिलवर सोलो ट्रेकसाठी गेलेल्या 31 वर्षीय टेक प्रोफेशनल अद्वैत उपाध्याय यांचा शोध अद्याप सुरू आहे. अद्वैत 7 ऑगस्ट रोजी शिवगंगे हिलवर पोहोचले होते. त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. आता शोधमोहीमेदरम्यान ड्रोनच्या माध्यमातून दाट झुडपांमध्ये मानवी शरीरासारखी एक वस्तू दिसून आली आहे. मात्र, ही वस्तू अद्वैत यांचा मृतदेहच आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. त्यामुळे अद्वैत यांच्या कुटुंबीयांसह शोध पथकाची चिंता वाढली आहे.

हेही वाचा : बिग फॅन म्हणत सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी यांची कोणासोबत भेट घालून दिली? VIDEO

CCTV फुटेजमध्ये काय दिसलं? 

अद्वैत हे IITचे माजी विद्यार्थी असून सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल म्हणून काम करतात. ते व्हाइटफिल्डमधील एका फायनान्स फर्ममध्ये कार्यरत असून कडुगोडी येथे राहतात. पोलिसांच्या माहितीनुसार, CCTV फुटेजमध्ये 7 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 7.30 वाजता अद्वैत शिवगंगे येथे पोहोचल्याचे आणि ट्रेक सुरू केल्याचे दिसून आले. त्यांना दुपारपर्यंत परतण्याची अपेक्षा होती, मात्र ते परतले नाहीत. अद्वैत यांनी शिवगंगे येथे जाण्यासाठी मोटरसायकल भाड्याने घेतली होती. ही मोटरसायकल नंतर डोंगराच्या पायथ्याशी उभी असलेली आढळली, मात्र अद्वैत यांचा तेथे कोणताही ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल फोनचा शेवटचा सिग्नल कुनिगल रोडवरील कुड्डुरु परिसरात ट्रेस केला. हा परिसर शिवगंगेच्या सामान्य ट्रेकिंग मार्गापासून वेगळा असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर जरांगेंना वापरायला दिली, टीकेनंतर मालक समोर, सगळं बोलले...