घाटकोपरमध्ये दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू, दोन चिमुकल्यांनीही गमावला जीव
ghatkopar landslide garib nagar chawl : घाटकोपर पश्चिमेतील गरीब नगर चाळीवर मध्यरात्री दरड कोसळून 7 ते 8 झोपड्या दबल्या. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घाटकोपरमध्ये दरड कोसळून 6 जणांचा मृत्यू
दोन चिमुकल्यांनीही गमावला जीव
ghatkopar landslide garib nagar chawl : मुंबईतील घाटकोपर पश्चिमेला असलेल्या गरीब नगर चाळीवर मंगळवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली. मध्यरात्री अचानक दरड कोसळल्याने परिसरातील नागरिकांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही. या दुर्घटनेत 7 ते 8 झोपड्या दरडीखाली दबल्या गेल्या. घटनेची माहिती मिळताच यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरडीखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
हेही वाचा : ब्रम्हकुमारी सेंटरमधील महिला, तरुणाचं एकतर्फी प्रेम; अन् आश्रम मालकाची हत्या
सहा जणांचा मृत्यू, तर 4 जण जखमी
या दुर्घटनेत एकूण 10 जण बाधित झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. यामध्ये चार जण जखमी असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कुर्ला भाभा रुग्णालयाचे डॉक्टर वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये 18 वर्षीय सोहेल अन्सारी याला डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच 14 वर्षीय मोहम्मद अन्सारी, 28 वर्षीय नईमुद्दीन इक्बाल खान आणि 16 वर्षीय साजिद अन्सारी यांचा समावेश आहे. या चौघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा : Personal Finance: 50,000 रुपये पगारात मुंबईत घर घेता येईल का? समजून घ्या पूर्ण गणित!
