ब्रम्हकुमारी सेंटरमधील महिला, तरुणाचं एकतर्फी प्रेम; अन् आश्रम मालकाची हत्या
Pune Crime News : पुण्यातील बाणेरमध्ये एकतर्फी प्रेमातून घनश्याम यांचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेचे घनश्यामसोबत संबंध असल्याचा संशय घेत सोलोमन शेंडगे याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ब्रम्हकुमारी सेंटरमधील महिला
तरुणाचं एकतर्फी प्रेम; अन् आश्रम मालकाची हत्या
Pune Crime News : पुण्यातील बाणेरमध्ये एकतर्फी प्रेमातून एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. बाणेरमधील एका मेडिटेशन सेंटरमध्ये अध्यात्माच्या मार्गावर असलेली एक महिला श्रद्धेने राहात होती. तिच्यावर सोलोमन सूर्यभान शेंडगे याचे प्रेम होते. दोघेही शाळेपासून एकमेकांना ओळखत होते. शेंडगेने या महिलेसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, संबंधित महिलेने आपण आता अध्यात्माच्या मार्गावर असल्याचे सांगत लग्नाला नकार दिला. त्यानंतर शेंडगे नाराज झाला. गेल्या सहा महिन्यांपासून तो महिलेला मेसेज आणि फोन करत असल्याचे तिचे म्हणणे आहे.
हेही वाचा : मुंबईकरांनो सांभाळा, पुढील काही तास तुफान पाऊस.. समुद्रानजीक Rain Bands सक्रिय
महिलेचे आश्रम चालकासोबत संबंध असल्याचा संशय, अन् केली हत्या
या महिलेचा आश्रम चालक घनश्याम नावाच्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय शेंडगेला होता. ज्या जागेवर हे मेडिटेशन सेंटर सुरू होते, ती जागा घनश्यामच्या कुटुंबाची होती. घनश्याम अनेक वर्षांपासून ब्रह्मकुमारी आश्रमाच्या सेवेत होता. तो या सेंटरमध्ये अकाउंटिंगचे कामही करत होता. या सेंटरसाठी घनश्यामच्या कुटुंबाने बाणेरमधील पाच गुंठे जमीन तात्पुरत्या वापरासाठी दिली होती. घनश्यामला यापूर्वी शेंडगेकडून त्रास होत असल्याचे त्याने आपल्या वडिलांना सांगितले होते.
हेही वाचा : Pune: मिसिंग लिंकबाबत मोठी अपडेट, प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा नाहीतर होईल घोळ!
