Pune: मिसिंग लिंकबाबत मोठी अपडेट, प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा नाहीतर होईल घोळ!

मुंबई तक

12 ऑगस्टला मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक तीन तास बंद राहणार आहे. पुणे-मुंबई वाहतूक जुन्या घाट मार्गाने वळवण्यात येणार असून वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या.

ADVERTISEMENT

mumbai pune expressway connecting link traffic diversion 12 august 2026
mumbai pune connecting link
Google CTA

पुणे: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर बुधवारी (12 ऑगस्ट) 3 तास वाहतूक बदल करण्यात येणार आहे. देखभाल-दुरुस्ती आणि मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी मिसिंग लिंकची मार्गिका तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.

मिसिंग लिंक नेमकी किती वेळ बंद?

12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मिसिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत देखभाल-दुरुस्तीची कामे तसेच मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक आहे.

वाहनांना जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून वळवणार

मिसिंग लिंकवरील पुणे-मुंबई मार्गिका बंद असताना सर्व वाहने जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गातून मुंबईच्या दिशेने वळवण्यात येणार आहेत.

हे ही वाचा>> पुण्याची गोष्ट : मिसिंग लिंकचे दोन महिन्यापूर्वी उद्घाटन, पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे

त्यामुळे या तीन तासांच्या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.