दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर जरांगेंना वापरायला दिली, टीकेनंतर मालक समोर, सगळं बोलले...

मुंबई तक

defender owner subhash bhosale : मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या वापरासाठी सांगोल्यातील शेतकरी आणि सराफ व्यावसायिक सुभाष भोसले यांनी नवी डिफेंडर गाडी दिली आहे. या गाडीची किंमत 1 कोटी 90 लाख रुपये असल्याचे भोसले यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

defender owner subhash bhosale
defender owner subhash bhosale
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर जरांगेंना वापरायला दिली

point

टीकेनंतर मालक समोर, सगळं बोलले...

defender owner subhash bhosale : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या बैठका आणि आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू असताना त्यांच्या वापरातील एका डिफेंडर गाडीचीही चर्चा होत आहे. ही नवीकोरी डिफेंडर सांगोला तालुक्यातील प्रगत शेतकरी आणि सराफ व्यावसायिक सुभाष भोसले यांनी दिली आहे. गेल्या 15 दिवसांत ही गाडी घेतल्याचे भोसले यांनी सांगितले. मराठा समाजासाठी झटणाऱ्या जरांगे पाटील यांना लांबचा प्रवास करताना सुविधा मिळावी, या भावनेतून आपण ही गाडी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Personal Finance: 50,000 रुपये पगारात मुंबईत घर घेता येईल का? समजून घ्या पूर्ण गणित!

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे दैवत - सुभाष भोसले 

सुभाष भोसले यांनी सांगितले की, जरांगे पाटील मराठा समाजातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी, फीमध्ये सवलत मिळण्यासाठी आणि नोकऱ्यांसाठी झटत आहेत. उपोषण आणि सततच्या प्रवासामुळे ते थकलेले असतात. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखरूप आणि आरामदायी व्हावा, यासाठी आपण त्यांना गाडी देण्याची विनंती केली. सुरुवातीला एवढी मोठी गाडी घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला होता. मात्र, आपण आग्रह केल्यानंतर त्यांनी गाडी वापरण्यास मान्यता दिल्याचे भोसले यांनी सांगितले. “आपण देवाला नवीन गाडी घेऊन जातो, त्याच भावनेने मी ही गाडी दिली. ते मराठा समाजाचे दैवत आहेत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : ‘पळू नका, लपू नका; चर्चेला सामोरं जा!’ राहुल गांधींचं थेट नाव घेत अशोक चव्हाणांची पोस्ट अन्...