बारामती : लग्नाआधी शारिरीक संबंध, ती एक गोळी आणि तरुणीचा मृत्यू
Baramati Crime News : बारामतीमध्ये लग्न ठरलेल्या 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. होणाऱ्या पतीने गोळी देण्याबाबत तरुणीने आईला सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बारामती : लग्नाआधी शारिरीक संबंध
ती एक गोळी आणि तरुणीचा मृत्यू
Baramati Crime News : बारामतीमध्ये लग्न ठरलेल्या 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तरुणी तिच्या होणाऱ्या पतीसोबत बाहेर गेली होती. त्यावेळी तिने आईला फोन करून अथर्व शारिरीक संबंधांची मागणी करत असून, तो आपल्याला एक गोळी देणार असल्याचे सांगितले होते. आईने तिला तातडीने घरी परतण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर तरुणी घरी परतली नाही. या प्रकरणी तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून तिचा होणारा पती अथर्व राजेंद्र मेहन (वय अंदाजे 27 वर्षे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ‘दहाड’ या सिरीजमधील कथानकाची आठवण होत असल्याची चर्चा होत आहे.
हेही वाचा : ‘पळू नका, लपू नका; चर्चेला सामोरं जा!’ राहुल गांधींचं थेट नाव घेत अशोक चव्हाणांची पोस्ट अन्...
दोघांचा लग्न करण्याचा निर्णय, पण त्या गोळीने तरुणीचा मृत्यू?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आणि अथर्व हे दोघेही बारामतीचे रहिवासी आहेत. तरुणीने बीएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते आणि त्यानंतर एमपीएससीच्या तयारीसाठी ती पुण्यात गेली होती. डिसेंबर 2025 पासून तिचे अथर्वसोबत प्रेमसंबंध होते. तरुणीच्या मैत्रिणीकडून तिच्या आईला या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली होती. त्यानंतर आईने मुलीशी नियमित संपर्क ठेवण्यास सुरुवात केली. 30 डिसेंबर रोजी आई आणि तिचा भाऊ पुण्याला गेले आणि तरुणीला बारामतीला घेऊन आले. त्यावेळी तरुणीने अथर्वसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगत त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोन्ही कुटुंबांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर 12 एप्रिल रोजी दोन्ही कुटुंबांची भेट झाली आणि दोघांचे लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शारिरीक संबंधांसाठी तगादा, तरुणीने आईला काय सांगितलं?
घरच्यांच्या संमतीने लग्न ठरल्यानंतर अथर्व आणि तरुणी नियमितपणे भेटत होते. मात्र, काही दिवसांपासून तरुणीच्या वागण्यात बदल झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. ती शांत राहू लागल्याने आईने तिच्या मैत्रिणीकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी अथर्व तिच्याकडे शारिरीक संबंधांसाठी तगादा लावत असल्याचे आणि तिला काही गोळ्या देत असल्याचे समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 6 ऑगस्ट रोजी अथर्व तरुणीला एमबीएच्या प्रवेशासाठी टीसी कॉलेजमध्ये घेऊन गेला होता. दुपारी तरुणीने आईला प्रवेश शुल्काबाबत मेसेज केला होता. तसेच अथर्वच्या आईला आणि मावशीला एका ठिकाणी सोडण्यासाठी जात असल्याचेही तिने सांगितले होते. आईने व्हिडिओ कॉल केला असता तरुणी अथर्वसोबत कारमध्ये असल्याचे दिसले.
