‘पळू नका, लपू नका; चर्चेला सामोरं जा!’ राहुल गांधींचं थेट नाव घेत अशोक चव्हाणांची पोस्ट अन्...
अशोक चव्हाण यांनी X पोस्टद्वारे राहुल गांधींना थेट आव्हान दिलं आहे. ‘Don’t run, Don’t hide’ म्हणत चव्हाणांनी राहुल गांधींना चर्चेला आणि वस्तुस्थितीला सामोरं जाण्याचा सल्ला दिला.
ADVERTISEMENT

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत राहुल गांधींना खुल्या चर्चेला आणि वस्तुस्थितीला सामोरं जाण्याचं आव्हान दिलं आहे.
अशोक चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये “Rahul Gandhi, Don't run, Don't hide. Face the debate, Face the Fact!” असं म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. त्यांच्या या पोस्टवर काही तासांतच शेकडो प्रतिक्रिया येत आहेत.
अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
अशोक चव्हाण यांच्या पोस्टचा थेट रोख राहुल गांधींकडे आहे. त्यांनी राहुल गांधींना संसदेतील चर्चेपासून किंवा प्रश्नांपासून पळून न जाता त्याला सामोरं जाण्याचं आव्हान दिलं आहे.
“Don’t run, Don’t hide, Face the debate, Face the Fact!” या शब्दांतून चव्हाण यांनी राहुल गांधींना थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे या पोस्टमुळे महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
